प्रोटीनची कमतरता होते दूर
तुम्ही आजवर अनेक प्रकारचे बर्गर खाल्ले असतील, बाजारत व्हेजपासून नॉनव्हेज अनेक प्रकारचे बर्गर उपलब्ध आहेत. कुणी बर्गरला फ्राय करून देतो तर कुणी शॅलो फ्राय. बर्गरमधील सर्वात महत्त्वाची बाब त्यातील टिक्की असते. टिक्की जर मांसाद्वारे तयार झाली असेल तर ती ज्युसी असणे आवश्यक आहे. ड्राय टिक्की खाण्यात फारशी मजा येत नाही. परंतु तुम्ही कधी डासांद्वारे तयार बर्गरबद्दल ऐकले आहे का? जगात एका देशात डासांद्वारे तयार बर्गर चवीने खाल्ला जातो. या बर्गरच्या चवीला लोक मोठ्या प्रमाणात पसंत करतात. तसेच हा बर्गर प्रोटीनने युक्त असतो. म्हणजेच एक बर्गर खाल्ल्यावर तुम्हाला प्रोटीनची कमतरता भासणार नाही.

दरवर्षी पावसाळ्यात डासांचा प्रकोप अनेक देशांमध्ये वाढत असतो. अशा स्थितीत आफ्रिकेतील लेक व्हिक्टोरियात देखली पाण्याच्या आसपास डासांची पैदास सुरू होते. या डासांपासून मुक्तता मिळविण्यासाठी येथील लोकांची एक विशेष ट्रिक असते. हे लोक डास मारण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषधाचा मारा करत नाहीत. तर हे लोक भांड्यांमध्ये डासांना कैद करतात. मोठ्या संख्येत डास मिळाल्यावर त्याद्वारे बर्गर तयार केला जातो.
डासांद्वारे तयार बर्गरच्या टिक्कीचा रंग काळा असतो. एक टिक्की तयार करण्यासाठी सुमारे 5 लाख डासांचा वापर होतो. याला एकत्र मॅश करत टिक्कीचे स्वरुप दिले जाते. जे लोक स्वत:च्या आहारात प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्रस्त असताना त्यांच्यासाठी हा बर्गर लाभदायक असतो. परंतु आफ्रिकेतील काही भागांमध्येच हा अजब खाद्यपदार्थ खाल्ला जातो.









