बैठक होवून झाले चार दिवस अनाधिकृत टपऱया हटणार कधी ?
प्रतिनिधी/ सातारा
एमआयडीसी ऑफिसच्या सहाकार्याने एमआयडीसी क्षेत्रातील अनधिकृत टपऱया काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी उद्योजक व पोलिसांच्या झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीला चार दिवस उलटूनही अद्याप अतिक्रमण हटावचा मुहूर्त निघाला नाही. यामुळे अनाधिकृत टपऱया हटणार कधी? एमआयडीसी क्षेत्रात किती जागेवर अतिक्रमण आहे. यांची ठोस माहिती अधिकाऱयांना नाही का ? तसेच अधिकारी कोणाच्या दबावाला बळी पडत आहेत. अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे.
औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या पोलिस विभागाकडील समस्यांबाबत व इतर विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मॅन्युफक्चरर्स असोसिएशन ऑफ साताराचे पदाधिकारी व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या समवेत चार दिवसापुर्वी मासभवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधिक्षक बन्सल यांनी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या.
सध्या सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये चोऱयांचे प्रमाण नगण्य आहे. हे शांततेचे वातावरण कायम राहण्यासाठी पोलीस विभागामार्फत गस्त पेट्रोलिंग वाढवण्यात येईल. अतिरिक्त एमआयडीसीमधील बंद असलेले पोलीस दूरक्षेत्र सुरू करण्याची सुचना संबंधित अधिकाऱयांना करण्यात आल्या. बॉम्बे रेस्टाँरट चौकामध्ये वाहतूक कोंडी नेहमीच होत आहे. त्याठिकाणी वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. नगरपालिका हद्दीमध्ये येत नसल्याने हा विषय अनेक वर्षे प्रलंबित आहे. तरी याबाबत उद्योजकाच्ंया सहकार्याने या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. प्रत्येक उद्योगामध्ये महिला दक्षता कमिटी स्थापन करण्यासाठी व त्याची माहिती उद्योजकांना व्हावी, यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे या वेळी ठरविण्यात आले.
टपऱया हटविण्यास विलंब का ?
सातारा शहरात अनाधिकृत टपऱयाचे अतिक्रमण वाढले आहे. या टपऱया हटविण्यासाठी पोलीसांकडून नेहमी सहकार्याची भूमिका दाखवण्यात येते. परंतु ठोस कारवाई ची दिशा का बदलते हे अद्याप अस्पष्टच आहे. अशीच अवस्था एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्राची झाली आहे. पोलीस अधीक्षकांनी बैठक घेवून चार दिवस झाले तरी अद्याप एकटी टपरी हटवण्यात आलेली नाही. पोलीस बंदोबस्त दिल्यानंतर या अतिक्रमण हटावच्या मोहिमेचा मुहूर्त मेढ रोवण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱयांनी सांगितले.








