ठाकरे गटाचे काही पदाधिकारी भाजपात
आचरा प्रतिनिधी
मालवण तालुक्यात भाजपने ठाकरे गट आमदार वैभव नाईकांना जोरदार धक्का दिला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर, बुधवळे, हडी येथील अनेकांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यात शिव उद्योग आघाडी मालवण तालुकाप्रमुख मंगेश गांवकर यांनी आपल्या समवेत बुधवळे सरपंच संतोष पानवलकर व दोन सदस्य, तसेच चिंदर ग्रामपंचायत सदस्य निलेश रेवडेकर, स्वरा पालकर, जान्हवी घाडी तसेच अनेक कार्यकर्ते घेऊन भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी हडी ग्रामपंचायत सदस्य ऋषीकेश आस्वलकर यांनीही भाजप मध्ये प्रवेश केला
मंगेश गांवकर यांच्या बरोबर बुधवळे येथील दिपक येरम, ऋषीकेश येरम, किरण जोईल, कृष्णा साटम, वैभव वाघ, अनिल येरम, आप्पा येरम, अमर सरमळकर, अविनाश सरमळकर, प्रकाश जाधव, अनंत सरमळकर, समिर टेंबुलकर, समिर घागरे, चिंदर येथील अरूण घाडी, भाई तावडे, प्रमोद परब, सागर परब, प्रमोद घाडी, केशव घाडी, नंदकुमार घाडी, अनिल घाडी, दिपक घाडी, दादू घाडी, गिरीश पवार, निखिल घाडी, हर्षाली गोलतकर, भारती गोलतकर, श्रेया पालकर, वासुदेव घाडी, गणेश पाटणकर, आशिर्वाद तावडे, रमेश घाडी, सचिन जाधव, संजय घाडी, नारायण घाडी, हेंमत घाडी, गणेश पाताडे, सौरभ परब, मंदार घाडी, शेखर पालकर, शिशिर पालकर, विद्याधर पालकर, शंकर पालकर, मनिष सावंत, अनंत आचरेकर, गणेश पालकर, नित्यानंद मेस्री, राजन पालकर, आत्माराम पालकर, रविंद्र पालकर, हडी येथील अनंत सुभेदार, तेजम शेडगे, अजिंक्य तोंडवळकर आदींनी भाजप प्रवेश केला.
हा प्रवेश आचरा येथे निलेश राणे यांच्या उपस्थतीत झालेल्या प्रवेशावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जेरॉन फर्नांडिस, जगदीश पांगे, संतोष गावकर, समीर बावकर, मुजफ्फर मुजावर, पळसंब सरपंच महेश वरक, अवधूत हळदणकर, संतोष कोदे, दीपक सुर्वे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सोसायटी अध्यक्ष देवेंद्र हडकर, मनोज हडकर, बाबू कदम यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.