रत्नागिरी :
शहरानजीकच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा १९० कोटी खर्चुन उभारण्यात येत आहे. मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या १,२०० मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. मात्र त्यापुढील झालेल्या कामाच्या टप्प्यातील अलावा परिसरातील बंधाऱ्यांच्या रचलेल्या पायाचे दगड समुद्राच्या उधाणाने सरकले आहेत. त्यामुळे त्या दगडांवर रचलेले टेटापॉडही खाली खचले आहेत.
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असताना पांढरा समुद्र मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची पाहणी करून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना या बंधाऱ्याचे काम लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या १,२०० मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. पत्तन विभागाने काही दिवसांपूर्वी ठेकेदाराची बैठक घेतली होती. लवकरात लवकर उर्वरित टण्याचे व बंधाऱ्याच्या टॉपचे काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या होत्या. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या पत्तन विभागाने केलेल्या सर्वेमधील ७ डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्यांचे काम झाले आहे.

सुमारे साडेतीन कि.मी. लांबीचा हा बंधारा आहे. मात्र सध्या पावसाच्या कालावधीत समुद्राला आलेल्या उधाणाच्या अजख लाटा या बंधाऱ्यावर येऊन थडकत आहेत. त्या लाटांच्या दणक्याने नव्याने उभारलेल्या टप्प्यातील बंधाऱ्याला तडाखा बसला आहे.
- प्रशासनाने गांभीयनि पहावे
लाटांच्या दणक्याने बंधाऱ्याच्या तळपायाखालची वाळू सरकून दगडही सरकले आहेत. त्यामुळे अलावा परिसरातील या प्रकाराने त्या बंधाऱ्यासाठी बसविण्यात आलेले टेटापॉडही काहीसे खाली खचल्याची बाब समोर आली आहे. याकडे प्रशासनाने गांभीयनि पाहण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.








