मंडणगड तालुक्यातील 3 गावातील सातबारे आता महाराष्ट्र शासनविरहित; जिल्ह्यात 564 गावठाणांपैकी 395 गावठाणांची द्रोण पाहणी पूर्ण; लवकरच द्रोण पाहणीला येणार वेग
रत्नागिरी प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या 2019 सालच्या शासन निर्णया नुसार, रत्नागिरी जिह्यातिल 546 शासकिय गावठाणांपैकी 395 गावठाणांचा द्रोण पहाणी पुर्ण झाली असुन उरलेल्या 169 गावठाणांची पहाणी लवकरच पुर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाकडुन सांगण्यात आले. मंडणगड मधिल तिन गावठाणांमधिल जमिनींना महाराष्ट्र शासनाचे नाव जाउन तिथल्या रहिवाशाचे नाव लागल्याचे जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाकडुन सांगण्यात आले.
महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेले कित्येक सातबारे आपल्या जिह्यात किंबहुना आपल्या राज्यात आहेत. या सातबा-यांवरती तिथल्या रहिवाशांचे नाव नसल्याने त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कोणतही कर्ज पकरण, खरेदी विकी यासारखे व्यवहार करण शक्य नव्हत. यामुळे जमिन असुनही नसल्यासारखीच परिस्थीती होती. याच समस्येचा विचार करता महाराष्ट्र शासनाने 20 फेब्रुवारी 2019 रोजी राज्यातील सर्व गावठाणांचा द्रोणच्या माध्यमातून सर्वे करुन त्यांचे नकाशे तयार काण्याचा निर्णय घेतला. हे नकाशे तयार झाल्यावर त्यात असणाऱया रहिवाशांचे मालकी हक्क, घराचा असिस्टमेंट, सनद यासारख्या गोष्टींची पडताळणी करुन मगच पत्येकाच्या नाव त्या संबंधित सातबा-यावर येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्dयात अशी 564 गावठाणं आहेत. त्यापैकी रत्नागिरी तालुक्यात 23, लांजा येथे 2, संगमेश्वर 15, चिपळुण तालुक्यात 81, खेड तालुक्यात 166,दापोलीमध्ये 133 आणि मंडणगड तालुक्यात 105 गावठाणं आहेत. डिसेंबर 2021 पासून रत्नागिरी तालुक्यात ही द्रोण पाहणी सुरु झाली. त्यानुसार रत्नागिरी, लांजा, संगमेश्व, चिपळुण, गुहागर, खेड या ठिकाणच्या गावठाणांची पाहणी पूर्ण झाली असून संबंधित नकाशे बनवण्याच काम पगतीपथावर असल्याच जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून सांगण्यात आले. यापैकी मंडणगड तालुक्यातील बुरी, पालघर आणि गोवले या 3 गावातील गावठाणांचे नकाशे पूर्ण होऊन संबंधित सातबारे रहिवाशांच्या नावावर करण्यात आले आहेत. या पकियेत 1 लाख 900 इतकी सनद रक्कम सरकारी खजिन्यात जमा झाल्याचे जिल्हाअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडुन सांगण्यात आले. रत्नागिरी जिह्यात या द्रोण पाहणीचे काम, तसेच नकाशे तयार करण्याचे काम सर्व्हे ऑफ इंडिया (एसो. ओ. एस.) या संस्थेमार्पत होत आहे. पावसाळी हंगाम सरल्यानंतर आता दोण पहाणिच काम पुन्हा वेगाने होणार असल्याच जिल्हाअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडुन सांगण्यात आले.









