2028 मध्ये 9.8 लाख कोटीची असणार उलाढाल
90 च्या दशकातील जाहिरातीत रेजरची तुलना रेसर कार किंवा जेटशी केली जात होती. शॉवर जेलच्या गंधाची तुलना वाइल्ड क्रीचर्ससोबत व्हायची. शेल्फमध्ये पुरुषांसाठी उत्पादने काळ्या किंवा नियॉन रंगाच्या पॅकमध्ये ठेवली जात होती. ‘वन साइज फिट फॉर ऑल’च्या धर्तीवर त्यांना बाजारात सादर केले जात होते. परंतु आता पुरुष स्वत:च्या लुकवरून अलर्ट झाले आहेत.
केस, त्वचेपासून बोटोक्स ट्रीटमेंटपर्यंत विशेष वेळ अन् पैसा पुरुष खर्च करत आहेत. मेल ग्रूमिंगचा बाजार 2022 पर्यंत 6.57 लाख कोटीचा होता, 2028 मध्ये हे प्रमाण वाढून 9.4 लाख कोटी होणार आहे. मेल ग्रूमिंगच्या जागतिक बाजारात स्कीन केयरचा हिस्सा 45 टक्के आहे. पुरुषांचा भर सध्या हेअर स्टायलिंग, दाढी अन् पर्नलाइज्ड ग्रूमिंगवर आहे. अस्ताव्यस्त केसांचा लुक पुरुषांमध्ये वेगाने अलोकप्रिय होत आहे. सुंदर दिसण्याची इच्छा अन् उत्तमप्रकारे राखलेली दाढी पौरुषत्व अन् आत्मविश्वास वाढत असल्याच्या धारणेद्वारे हा टेंड प्रेरित आहे.

चीनमध्ये 2020 पर्यंत पुरुषांची स्कीन केयर इंडस्ट्री 14 हजार कोटी रुपयांची होती. 2026 मध्ये हे प्रमाण 23 हजार कोटीपर्यंत जाणार आहे. लोकांमध्ये आता सेल्फ केयरचा विचार बळावला आहे. या संधीला ब्रँड्सनी ओळखून अनेक उत्पादने सादर केली आहेत.
ऑर्गेनिक उत्पादनांवर पुरुषांना भरवसा
पुरुषांचा ऑर्गेनिक उत्पादनांवरील भरवसा वाढत आहे. स्वत: फेशियल करण्यासोबत या उत्पादनांचा ते वापर करू लागले आहेत. त्वचेला पोषण देण्यासाठी आयव्ही ड्रिप लावून घेत आहेत. एक्सफोलिएटर, स्क्रब आणि लोशन त्यांच्या यादीत सामील झाले आहे. याचबरोबर जेंडरलेस नेल पॉलिश आणि शनेल तसेच वॉरपेंटची मेन्स रेंज पुरुषांच्या सौंदर्य साम्राज्याला वाढविण्यास महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

जॉ लाइनमध्ये फिलर्स
ब्युटी स्टँडर्ड्सवर सोशल मीडियाच्या प्रभावामुळे पुरुषांचा दृष्टीकोन बदलला आहे. सर्वात चकित करणारा ट्रेंड बोटोक्स अन् फिलर्सचा वापर आहे. विशेषकरून जॉ लाइनमध्ये (जबड्याचा खालील हिस्सा) याचा वापर होतोय, असे त्वचा तज्ञ डॉ. डेव्हिड जॅक यांनी सांगितले आहे. अमेरिकेच्या सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जननुसार अशाप्रकारची इंजेक्शन घेणाऱ्या पुरुषांची संख्या 99 टक्क्यांनी वाढली आहे. तर प्लास्टिक सर्जरी क्लीनिक त्यांना नॉन सर्जिकल आणि मिनिमल इन्वेसिव्ह पद्धत सुचवित आहे, यामुळे नैसर्गिक पद्धतीने लुक्स चांगला होत आहे.









