रत्नागिरी :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियाद्वारे जाहीर केले होते. दरम्यान, रविवारी ‘अॅडव्हाटेज विदर्भ’ या कार्यक्रमाच्या समारोप सत्रात बोलताना रिफायनरी प्रकल्पाबाबत त्यांनी जाहीर भाष्य केले. रिफायनरीच्या एका मेगा कॉम्प्लेक्सऐवजी त्याची लहान युनिट्स तयार करण्याची योजना आखली जात आहे. या मेगा रिफायनरी प्रकल्पाचे एकूण तीन भाग होणार असून त्यापैकी एक भाग रत्नागिरीत तर अन्य दोन भाग दक्षिणेतील राज्यांमध्ये साकारण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला पेंद्रीय मंत्री पियुष गोयल हे उपस्थित होते अशी माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे.








