विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकत्र लढण्याचा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्य़ा बैठकीत दिसला. त्याचबरोबर पक्षसंघटनेच्या निवडणूका घेऊन पक्षांतर्गत मोठे बदल करण्याच्या तयारीत पक्ष असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये पक्षाच्या नेत्यांनी भाजपविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे. या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील जेष्ठ नेत्यांना काही जबाबदाऱ्यांची आठवण करून देऊन कानपिचक्याही दिल्या असल्याचे समजते. तसेच विरोधकांशी लढताना महाविकास आघाडी भक्कम ठेवा असा सल्लाही त्यांनी बैठकीत दिला आहे.
या बैठकीनंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “आजच्या पक्षाच्या बैठकीमध्ये विधानसभा आणि लोकसभा मविआमध्येच राहूल लढवली पाहीजे यावर एकमत झाले आहे. तसेच पक्षसंघटनेत बदल करण्यासाठी काही दिवसात निवडणूका घेण्यात येतील. सलग तीन वर्षे तालुकाध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष असणाऱ्यांऐवजी आता नविन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.” अशी माहीती जयंत पाटीलांनी दिली.








