सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका आजी माजी खेळाडू , क्रीडा मंडळ व स्पर्धा आयोजकांची सभा बुधवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मनमानी ,हुकुमशाही कारभारावर नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन वर बहिष्कार टाकण्याचे एकमताने ठरले तसेच सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन मान्यताप्राप्त स्पर्धा , तालुका व जिल्हा निवड चाचणी न खेळण्याचे सर्वानुमते ठरले.सावंतवाडी तालुका खेळाडू व आयोजक संघटनेची स्थापना करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा खेळाडू व आयोजक संघटनेला पूर्ण ताकदीने पाठींबा देण्याचे एकमताने ठरले.
सभेत तालुक्यातील 12 संघ व 16 आयोजक मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक विषयांवर चर्चा झाली. नजीकच्या काळात चांगल्या दर्जेदार स्पर्धा आयोजन करण्याचे ठरले. संपूर्ण ताकदीने तालुका व जिल्हा खेळाडू व आयोजक संघटनेचे काम करण्याचे ठरले.









