कर्नाटक युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट स्पर्धेचा अंतिम सामना आज मीडिया इलेव्हन संघाने आठ गाडी राखून जिंकला. के यु डब्ल्यू जे चषक या दोन दिवसीय टूर्नामेंटची आज सोमवार दि.२९ जानेवारी रोजी पोलीस परेड मैदानावर आज सांगता झाली. आज झालेल्या अंतिम सामन्यात मीडिया इलेव्हन संघाने के यु डब्लू जे संघावर आठ गडी राखून विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले,यास्पर्धेत एकूण १० संघानी सहभाग घेतला होता . या स्पर्धे मध्ये के यु डब्ल्यू जे इलेव्हन संघाच्या स्टीफन यांना सर्वोत्तम फलंदाज तर सुशांत यांना सर्वोत्तम गोलंदाज, व हेमंत यांना बेस्ट कॅचर, शशी यांना बेस्ट ऑल राउंडर, अरबाज यांना सर्वोत्तम यष्टीरक्षक, संतोष के यांना सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी पारितोषिके देऊन या खेळाडूंना गौरविण्यात आले. बेळगावात पहिल्यांदाच एवढ्या मोठया क्रिकेट स्पर्धेचे आयोजन के यू डब्लू जे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, जिल्हापोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









