फाईल गायब प्रकरण
बेळगाव : महापालिकेमध्ये महापौरांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप होत आहे. राज्यपाल शुक्रवारी बेळगावात येणार आहेत. त्यांची आम्ही भेट घेणार असून त्यांच्याकडे महापालिकेतील कारभाराबद्दल संपूर्ण माहिती देणार असल्याचे महापौर शोभा सोमणाचे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेमध्ये राजकारण पेटले आहे. नगर प्रशासन संचालनालयाकडून आलेल्या नोटिसीनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सत्ताधारी पक्ष आयुक्तांवर आरोप करीत आहेत तर विरोधी गटाने नगरसेवक महापौरांवर आरोप करीत आहेत. एकूणच महापालिका आरोप आणि प्रत्यारोपामुळे राज्यभरात चर्चेला आली आहे. महापौरांनी फाईल गायब केली म्हणून विरोधी पक्षांनी आरोप केले आहेत. त्यामुळे आता महापालिकेमध्ये जो प्रकार घडत आहे त्याची संपूर्ण माहिती राज्यपालांना महापौरांसह त्यांचे शिष्टमंडळ देणार असल्याचे सांगण्यात आले.









