पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील पावसाचा इशारा लवकरच हटणार असून, कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, विदर्भात पुढील 24 तासांत तुरळक पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
पश्चेमकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात गेल्या आठवडय़ात पावसाने हजेरी लावली. गेले दोन दिवस राज्याच्या इतर भागातील पाऊस कमी झाला असला तरी विदर्भातील काही भागात मात्र पाऊस कायम आहे. पुढील 24 तास हा पाऊस राहणार असून, त्यानंतर मात्र कोणताही इशारा राज्यात नाही. राज्यात हवामान कोरडे राहणार असून, महाराष्ट्रातील बहुतांश भागांत कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. त्यामुळे आता उन्हाच्या झळा वाढण्याची चिन्हे आहेत.
अधिक वाचा : ‘शिवसृष्टी’साठी राज्य सरकारकडून 50 कोटींचा निधी प्राप्त








