कोल्हापूर :
मोक्याच्या गुह्यात गेली अनेक वर्षे फरारी असलेला मटकाकिंग व रेकॉर्डवरील गुन्हेगार सम्राट सुभाष कोराणे (रा. वेताळमाळ, तालीमजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याने बुधवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात स्वत:हून हजर झाला. यावेळी न्यायालयाने आदेश दिल्याने, पोलिसांनी त्याला अटक करीत, न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यामुळे त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली. याचदरम्यान पोलिसांनी गुन्हेगार कोराणेला वैद्यकिय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणले. त्यावेळी त्याच्या नातेवाईकासह समर्थकांनी गर्दी केली होती.
शहरातील यादवनगर परिसरामध्ये असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला याचा पती सलीम मुल्ला याच्या जुगार अड्डा सुऊ होता. याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना बातमीदाराकडून समजली. त्यांनी या मटका अड्यावर प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांना छापा टाकून कारवाई करण्याबाबतचा आदेश दिला. त्यावऊन प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी 8 एप्रिल 2019 रोजी छापा टाकला होता. या छाप्यावेळी पोलिसांना मटका जुगाराच्या चिठ्ठ्या, रेकॉर्ड आणि मोठी रोकड मिळाली होती. यावेळी मुल्ला गँगचा प्रमुख सलीम यासिन मुल्ला याच्या सांगण्यावऊन, त्याची पत्नी माजी महापौर शमा मुल्ला हिच्या चिथावणीने सुमारे 50 हून अधिक समर्थकांनी या पोलीस पथकाला विरोध करीत, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक शर्मा यांच्यास्त्यांचा अंगरक्षक निरंजन पाटील व कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळी यांना धक्काबुक्की केली. यावेळी अंगरक्षक पाटील याने संरक्षणार्थ काढलेले पिस्तुल काडतुसांसह रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश काळे याने पळवून नेले होते.
या घडल्या प्रकाराची तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख याच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी मटकाकिंग सलीम मुल्लाच्या गँगविरोधी मोकातंर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. त्या प्रस्तावाची पोलीस अधीक्षकांच्या छाननीनंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी या मोक्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यानंतर मोकातंर्गंत कारवाई कऊन या गँगची चौकशी सुऊ केली. चौकशीमध्ये मुल्ला गँगचे लागेबांधे संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आदी राज्यातील मटक्याचे कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. त्यावऊन तपासी अधिकारी पोलीस उपाअधीक्षक कट्टे यांनी या गँगच्या मुंबई मटक्याचे मालक सावला बंधूसह कोल्हापूरातील मटकाकिंग सम्राट कोराणे, इचलकरंजीतील अग्रवाल बधू याच्यासह 44 जणाविरोधी गुन्हा दाखल करीत, 42 जणांना अटक केली. या 42 जणांचा तब्बल साडेचार वर्षानंतर न्यायालयाने जामिनावर मंजुर केल्याने, त्यांची कारगृहातून सुटका झाली.
पण गुन्हा दाखल झाल्यापासून मटकाकिंग सम्राट कोराणे आणि प्रकाश उर्फ पप्पू हिरजी सावला (रा. वेस्ट बोरिवली, मुंबई) हे दोघे पसार झाले. त्यांनी अटकपूर्व जामिन मिळावा. यासाठी विशेष मोका न्यायालयापासून, मुंबई उच्च न्यायालय, दिल्ली सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केले. पण उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामिनअर्ज फेटाळून लावित, त्यांना फरारी घोषीत केले. या फरारी दोघा गुन्हेगाराचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. पण हे दोघे तपासी पोलीस पथकाला चकवा देवून पसार होण्यास यशस्वी होत होते.
अशा या मोक्यातील फरारी गुन्हेगार सम्राट कोराणे याने बुधवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात स्वत:हून हजर झाला. त्यावेळी न्यायालयाने त्याला अटक करण्याविषयी पोलिसांना आदेश दिला. पोलिसांनी अटक कऊन, पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची रवानगी मोठ्या पोलीस बंदोबस्तात कळंबा कारागृहात करण्यात आली.
पप्पू सावला अद्यापी फरारी
सलीम मुल्ला गँगविरोधी पोलिसांनी मोकातंर्गत कारवाई केली करीत, या गँगच्या 44 बड्या धेंड्याविरोधी गुन्हा दाखल केला होता. या गँगमधील आतापर्यंत 42 जणांना अटक करण्यात आली आहे. सम्राट कोराणे व प्रकाश उर्फ पप्पू सावला हे दोघे अद्यापी फरारी होते. बुधवारी कोराणे स्वत:हून न्यायालयासमोर हजर झाल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे या गँगचा सावला हा एकमेव गुन्हेगार अद्यापी फरारी राहिला आहे.








