अशी कामगिरी करणारी पहिली एअरलाईन्स कंपनी ठरली इंडिगो
वृत्तसंस्था /मुंबई
इंटरग्लोब एव्हीएशन लिमिटेड म्हणजेच इंडिगोने बाजार मूल्याच्या कामगिरीत बुधवारी जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा आकडा प्राप्त केला आहे. अशी अव्वल कामगिरी करणारी ही देशातील पहिली एअरलाईन्स कंपनी ठरली आहे. बीएसईवर इंडिगोचे समभाग हे बुधवारी 3.55 टक्क्यांच्या वेगाने वधारुन 2619.85 रुपयावर बंद झाले आहेत. तसेच इंट्राडेमधील व्यवहारात 2634.25 रुपयाचा टप्पा प्राप्त करत नवा विक्रम नेंदवला आहे. यासोबत कंपनीचे बाजारमूल्य जवळपास 1,01,007.56 कोटी रुपये झाले आहे.
एका महिन्यात इंडिगोच्या इतक्या एअरक्राफ्टची खरेदी
सोमवार 19 जून रोजी इंडिगोने 500 एअरबस ए320 फॅमिली एअरक्राफ्टच्या खरेदीचे दिले होते आदेश. त्याच्यासोबतच इंडिगो एकावेळी मोठी आर्डर देणारी पहिली भारतीय एअरलाईन्स कंपनी बनलेली आहे. इंडिगोच्या अगोदर हा विक्रम आर इंडियाच्या नावावर होता. सदरच्या एअरक्राफ्टची डिलिव्हरी ही 2023 ते 2035 पर्यंत करण्यात येणार असल्याची अपेक्षा आहे.
2027 पर्यंत दुप्पट प्रवासी
- देशामध्ये कोविडच्या अगोदरच्या तुलनेत 9 टक्के अधिक विमान प्रवासी संख्या होणार आहे. रोज सरासरी 4.5 लाख लोक प्रवास करतात.
- 2013-14 मध्ये 6 कोटी विमान प्रवासी होते ते आता वधारुन 20 कोटी झाले आहेत.
- 2027 पर्यंत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या वाढून 40 कोटी होणार असल्याची अपेक्षा आहे.
- देशामध्ये 8 वर्षात एअरपोर्ट 74 ते 141 पर्यंत वाढले आहेत. तसेच आगामी पाच वर्षांमध्ये 80 नवीन एअरपोर्ट होण्याचे संकेत आहेत.








