सेन्सेक्स 539 अंकांनी मजबूत : जागतिक बाजारही तेजीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत तेजीसोबत बंद झाले आहेत. जागतिक पातळीवर झालेल्या विविध घडामोडींमधील विषयांमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या केंद्रीय बँकेने चालू वर्षातील तिसऱ्यांदा व्याजदर कपातीचा अंदाज व्यक्त केला असल्याने बाजार तेजीत राहिले होते. जगभरातील मुख्य बाजारांमधील कामगिरीत गुरुवारी तेजीचा कल राहिल्याचा लाभ हा भारतीय शेअर बाजाराला झाला होता. सलग दुसऱ्या दिवशी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 539.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 72,641.19 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 172.85 अंकांनी वधारुन निर्देशांक 22,011.95 वर बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये चौथ्या सत्रात एनटीपीसीचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.55 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच पॉवरग्रिड कॉर्प, इंडसइंड बँक, टाटा स्टील, टाटा मोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारांची स्थिती
जागतिक बाजारात सर्वत्रच गुरुवारी तेजीचा कल होता. जगातील मुख्य बाजारांच्या कामगिरीत गुरुवारी आशियातील बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा सियोल, जपानचा टोकीओ आणि हाँगकाँगचा बाजार तेजीसह बंद झाला. तर चीनचा शांघाय हा शेअर बाजार मात्र घसरणीसह बंद झाला. युरोपीयन बाजारात सकारात्मक वातावरणात व्यवहार झाले. तसेच अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटमध्ये बुधवारी चांगली तेजी राहिली होती. जागतिक बाजारात कच्चे तेल (ब्रेंट क्रूड) 0.08 टक्क्यांनी प्रभावीत होत 85.88 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बीपीसीएल 587
- एनटीपीसी 325
- पॉवरग्रिड कॉर्प 273
- टाटा स्टील 150
- कोल इंडिया 432
- इंडसइंड बँक 1484
- टाटा मोटर्स 964
- हिंडाल्को 539
- जेएसडब्ल्यू स्टील 812
- सिप्ला 1448
- टेक महिंद्रा 1282
- अदानी पोर्टस् 1262
- आयटीसी 421
- बजाज ऑटो 8750
- अल्ट्राटेक सिमेंट 9600
- आयशर मोटर्स 3918
- महिंद्रा आणि महिंद्रा 1865
- बजाज फिनसर्व्ह 1602
- एसबीआय 744
- एचडीएफसी बँक 1445
- सन फार्मा 1565
- बजाज फायनान्स 6715
- रिलायन्स 2901
- अदानी एंटरप्रायझेस 3066
- डॉ. रे•िज लॅब्ज 6128
- कोटक महिंद्रा 1772
- हिरो मोटोकॉर्प 4519
- अपोलो हॉस्पिटल 6182
- नेस्ले 2553
- ब्रिटानिया 4806
- अॅक्सिस बँक 1035
- टीसीएस 3972
- एचयुएल 2242
- युपीएल 455
समभाग घसरलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल 1220
- एचडीएफसी लाइफ 622
- ओएनजीसी 262
- मारुती सुझुकी 11908
- आयसीआयसीआय 1081
- एशियन पेंटस् 2821
- इन्फोसिस 1554









