सेन्सेक्स 182 तर निफ्टी 88 अंकांनी वधारला: जागतिक पातळीवर मिळताजुळता कल
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात अंतिम एक तासात बाजार सावरला आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये मिळताजुळता कल राहिल्याचे दिसून आले. दरम्यान धातू क्षेत्राचा निर्देशांक 2 टक्क्यांनी तेजीत राहिला आहे. शेवटी एका तासात मार्केटमधील तेजी बाजाराला लाभदायक ठरली आहे. अमेरिकेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेलच्या समभागांमध्ये तेजीने बाजाराला बळ मिळाले आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरला बुधवारी 182.34 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 0.22 टक्क्यांसह वधारुन 81,330.56 वर बंद झाला. याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील मजबूत होत बंद झाला आहे. अंतिम क्षणी निफ्टी 88.55 अंकांनी वधारुन 24,666.90 वर बंद झाला आहे.
इटर्नल, टेक महिंद्रा, मारुती, महिंद्रा आणि महिंद्रा, इन्फोसिस, इंडसइंड बँक आणि एचसीएल टेक प्रमुख म्हणून लाभात राहिले आहेत. सोबत कोटक बँक, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक मुख्यत्वेकरुन घसरणीत राहिले.
आयटी आणि धातूमध्ये चमक
बुधवारी धातू, स्टीलसह आयटीचे समभाग चमकले आहेत. आयटी कंपन्यांचे शेअर 1.34 टक्क्यांनी वाढले. आयटी कंपन्यांचा महसूलातील एक मोठा हिस्सा अमेरिकेला मिळत असतो. यामुळे या क्षेत्राला वेगळे महत्त्व राहिले आहे.
आशिया बाजार
आशिया बाजारांत बुधवारी मिळताजुळता कल राहिला होता. निक्केई 225 0.57 टक्क्यांनी घसरणीत राहिला आहे. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.67 टक्के वर तेजीत होता. वॉल स्ट्रीट इंडेक्समध्ये मंगळवारी मिळताजुळता कल राहिला होता. एसअँडपी 500 0.72 टक्क्यांनी वाढला असून 5,886.55 वर बंद झाला. नॅस्डॅक कंपोझिट 1.61 टक्के वधारुन 19,010.08 वर बंद झाला. डोव्ह जोन्स 0.64 टक्क्यांनी घसरुन 42,140.43 बंद झाला.









