सेन्सेक्स 64 अंकांनी तेजीत : जागतिक परिणाम कायम
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारातील चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी आशियाई बाजारात मिळताजुळता कल राहिला होता. दरम्यान यावेळी भारतीय बाजार तेजीची झुळूक प्राप्त करत बंद झाला आहे. यामध्ये गुंतवणूकदार, कंपन्यांचे तिमाही अहवाल आणि ट्रम्प यांचे टॅरिफचे धोरण अजून स्पष्ट नसल्याच्या कारणास्तव बाजाराचा प्रवास काहीसा दबावात सूरु असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारच्या सत्रात सार्वजनिक बँकांच्या समभागांचे बाजाराला समर्थन मिळाले आहे. यावेळी बीएसई सेन्सेक्स 36.24 अंकांनी प्रभावीत होत खुला झाला आहे. मात्र अंतिमक्षणी सेन्सेक्स 63.57 अंकांनी वधारुन निर्देशांक 82,634.48 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 16.25 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 25,212.05 वर बंद झाला आहे. सेंसेक्समधील कंपन्यांमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, एसबीआय, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, आयटीसी, एशियन पेंट्स, एल अँड टी, मारुती, अॅक्सिस बँक यांचे समभाग हे वधारुन बंद झाले. दुसऱ्या बाजूला श्रीराम फाइनान्स, इटरनल (झोमॅटो), जेएसडब्ल्यू स्टील, सिप्ला, हीरो मोटो, बजाज फाइनान्स आणि बजाज ऑटो निफ्टीत घसरणीत राहिले आहेत.
जागतिक बाजारांचे काय संकेत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इंडोनेशिया सोबत प्रारंभीक व्यापार कराराची घोषणा केल्यानंतर बुधवारी आशियाई बाजारात मिळताजुळता कल राहिला आहे. तर निक्केई इंडेक्स 0.11 टक्के तेजीत होता. बाजारात असणाऱ्या अप्रत्यक्ष दबावाला जागतिक पातळीवरुन घटनांचा आधार आहे. येणाऱ्या काळात ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण व अन्य समीकरणे सुरळीत होत नाहीत, तोपर्यंत गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास वेळ लागणार असल्याचे संकेत अभ्यासकांकडून दिले जात आहेत.









