सेन्स्sक्स 365 तर निफ्टी 120.90 अंकांनी प्रभावीत : जागतिक संकेताचे परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू सप्ताहातील अंतिम सत्रात जागतिक पातळीवरील वातावरणामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखाच्या भाषणा अगोदरच आठवड्यातील शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरणीची नेंद करण्यात आली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 365 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 64,886.51 वर बंद झाले आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 120.90 अंकांनी प्रभावीत होत 19,265.80 वर बंद झाला. यावेळी मुख्य कंपन्यांमध्ये जिओ फायनाशिअल तेजीत राहिली आहे.
सेन्सेक्समध्ये 30 समभागांपैकी 23 समभाग हे घसरणीत तर 7 समभागांमध्ये तेजीचा कल राहिला होता. लिस्टिंगनंतर पहिल्यादाच जिओ फायनान्शिअलचे समभाग तेजीत राहिले. या अगोदर पाच दिवसांपर्यंत लोअर सर्किटर लागले होते. याच दरम्यान दिवसभर चढउताराची स्थिती बाजारात राहिली होती. पहिल्या दिवशी खुला झालेला विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा आयपीओ 3.81 पटीने सब्सक्राइब झाला आहे. निफ्टीमध्ये मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकांमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे.
बजाज फायनान्स्चे समभाग हे सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. सेन्सेक्समध्ये फक्त 6 समभाग वधारले आहेत. यात बजाज फायनान्स, एशियन पेन्ट्स, भारती एअरटेल, टायटन आणि अॅक्सिस बँक व आयसीआयसीआय बँक यांचे समभाग हे वधारुन बंद झाले.
दुसऱ्या बाजूला सेन्सेक्समधील समभागात 24 समभाग हे प्रभावीत झाले आहेत. यात इंडइसइंड बँक, जेएसडब्लू स्टील, लार्सन अॅण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि जेएफएसएल हे समभाग नुकसानीत राहिले. सर्वाधिक नुकसान हे इंडसइंड बँकेचे समभाग हे 1.89 टक्क्यांनी घसरले आहेत.
आगामी आठवड्यात जागतिक पातळीवरील घडमोडींसोबत देशातील घडमोडींचा मोठा प्रभाव भारतीय बाजारात राहणार असल्याचे दिसून येणार आहे. असे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे. यात फेडरल रिझर्व्हचा निर्णय व तिमाही अहवालाच्यानंतर गुंतवणूकदार कोणती भुमिका घेणार आहेत. हेही पहावे लागणार असल्याचे काही अभ्यासकांनी यावेळी स्पष्ट केले आहे.









