अल्ट्राटेक सिमेंट मजबूत : सेन्सेक्स 137 अंकांनी वधारला
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील बुधवारच्या सत्रात एक दिवसाच्या विश्रातीनंतर सेन्सेक्स व निफ्टी हे तेजीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये दिवसभरातील कामगिरीत बाजारात चढउताराची स्थिती राहिली होती. याचदरम्यान अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग हे वधारुन बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स बुधवारी दिवसअखेर 137.50 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 65,539.42 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 12.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 19,446.95 वर बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये बुधवारच्या सत्रात इंडियन ओव्हरसीज बँकेचे समभाग हे सात टक्क्यांनी तेजीत राहिले होते.
मुख्य कंपन्यांमध्ये क्रॉम्पटनचे समभाग हे सहा टक्क्यांनी नुकसानीत राहिले. तर निफ्टीमधील अपोलो हॉस्पिटलचे समभाग हे 2.60 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. या वेळी अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग हे 2.37 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत.
बीएसई सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग हे सर्वाधिक 2.44 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. तर एनटीपीसीचे समभागही वधारले आहेत. यासोबतच टाटा मोर्ट्स, इन्फोसिस, पॉवरग्रिड कॉर्प, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे 1 -1 टक्क्यांनी वधारले. यासह मारुती सुझुकी, विप्रो, स्टेट बँक, सनफार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा व एचसीएल टेक यांचे समभाग हे तेजीत राहिले होते.
हे समभाग घसरणीत
सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचे समभाग हे सर्वाधिक 1.78 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. यासोबतच भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एशियन पेन्ट्स, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. बँक आणि धातू वगळता अन्य सर्व क्षेत्रांचा निर्देशांक हा वधारला होता. यामध्ये वाहन, रियल इस्टेट, आयटी आणि कॅपिटल गुड्स, यांचे निर्देशांक 0.5 ते 1 टक्क्यांनी तेजीत राहिले.









