एचसीएल, इंडसइंड बँक यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत : सेन्सेक्स 159 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारीही नुकसानीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये दिवसभराच्या दरम्यान चढउताराची स्थिती काही काळ राहिल्याने बाजार नुकसानीसोबत बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बुधवारी दिवसअखेर 159.21 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 59,567.80 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 41.40 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 17,618.75 वर बंद झाला आहे. यामध्ये एचसीएल टेक , इन्फोसिस आणि इंडसइंड बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
प्रमुख क्षेत्रांची स्थिती
देशातील बाजारामध्ये बुधवारी माहिती आणि तंत्रज्ञान, पॉवर यांचे निर्देशांक 1 ते 1 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. याच्या व्यतिरिक्त धातू, ऑईल अॅण्ड गॅस व औषध क्षेत्रांमध्ये लिलाव झाला. तसेच बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपचा निर्देशांक प्रभावीत होत बंद झाला आहे.
हे समभाग नुकसानीत :
बीएसईमध्ये एचसीएल टेक 2.40 टक्क्यांनी समभाग घसरुन बंद झाले. यासोबतच इंडसइंड बँक, टीसीएस, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक, सनफार्मा, टाटा मोर्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती सुझुकी आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला अॅक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक 1.05 टक्क्यांनी वधारले आहेत. यामध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. सध्या तिमाहीचे नफा कमाईचे कंपन्यांचे अहवाल सादर होत असल्याच्या कारणास्तव व नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्यामुळे नवीन आर्थिक बदल व कंपन्यांच्या कामगिरीचा अहवाल यांचा अभ्यासक करुन गुंतवणूकदार शेअर बाजारांमध्ये आपली गुंतवणूक करण्याचा कल निश्चित करत असल्याचे दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.









