मुंबई:
सेन्सेक्समधील आघाडीवरील 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मागच्या आठवड्यात 82 हजार 169 कोटी रूपयांनी वाढले असल्याची माहिती आहे. यामध्ये एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांच्या भांडवलात अधिक वाढ झाली असल्याची माहिती आहे.
मागच्या आठवड्यात मंगळवार व शुक्रवारी शेअरबाजाराला सुट्टी होती. बीएसई सेन्सेक्स 841 अंकांनी वधारला होता. रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी आणि आयटीसी यांच्यासह 8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात वृद्धी दिसून आली आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 31,553 कोटींनी वाढून 9,29,752.54 कोटी रूपये इतके झाले होते.
एचडीएफसीचे बाजार भांडवल 18,877 कोटी रूपयांनी वाढत 5,00,878 कोटी रूपये इतके राहिले होते. भारती एअरटेलचे बाजार भांडवल 9,533 कोटी रूपयांनी वाढत 4,27,111 कोटी रूपयांवर पोहचले हेते.









