दरवेळी जिवंत होण्याची किमय
मृत्यू आणि जीवनाचे सत्य काय यावरून अनेक थेयरी आहेत. मृत्यूनंतर जिवंत होणे अशक्य असते असे मानले जाते, परंतु जगात एक असा इसम आहे, ज्याने एकदा नव्हे तर 6 वेळा मृत्यूवर मात केली आहे. टांझानियाचा रहिवासी असलेला इस्माइल अजीजीचा 6 वेळा मृत्यू झाला आणि दरवेळी तो जिवंत झाल्याचे सांगण्यात येते. अजीजी कथित स्वरुपात 6 वेळा मरून पुन्हा जिवंत झाला आहे. दरवेळी त्याला वैद्यकीय दृष्ट्या मृत घोषित करण्यात आले, तेव्हा तो अशा परिस्थितींमध्ये जिवंत आणि श्वास घेत परतला ज्यामुळे डॉक्टरही देखील अचंबित झाले. अजीजीचा पहिला मृत्यू कथित स्वरुपात कार्यस्थळी एका गंभीर दुर्घटनेनंतर झाला होता, त्याला मृत घोषित करण्यात आले होते. शवागारात त्याला ठेवण्यात आले आणि दफन करण्याची तयारी सुरू झाली, परंतु अंत्यसंस्कारापूर्वी त्याची झोप मोडली आणि तो बाहेर पडला. लोकांनी मला शवागारात नेले होते, परंतु मी उठून उभा राहिल्यावर मला थंडी वाजत होती. सुदैवाने शवागार बंद केले नव्हते आणि मी बाहेर पडू शकलो. मला पाहिल्यावर माझा परिवारही पळून गेला होता, कारण मी भूत असल्याचे त्यांना वाटले होते असे अजीजीने सांगितले.
पुनरावृत्ती घडली
दुसऱ्यांदा इस्माइलला मलेरियाची लागण झाली आणि त्याला मृत घोषित करण्यात आले. परंतु त्यानंतरही त्याचा श्वासोच्छवास सुरू झाला, कुटुंबीयांनी मृतदेहाला शवपेटीत ठेवण्याची तयारी केल्यावर तो पुन्हा जिवंत झाला, हे सत्र यानंतरही सुरू राहिले. मलेरियानंतर सर्पदंश होत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तो एका खोल ख•dयात पडून मृत्युमुखी पडला. अखेरच्या वेळी त्याचा मृतदेह शवागारात तीन दिवसांपर्यंत पडून होता.
अजीजीच्या या प्रकारामुळे स्थानिक लोकांनी त्याच्या वापसीला काळी जादू किंवा अलौकिक शक्तींशी जोडले. काही लोकांनी तर त्याच्यावर जादूटोणा करण्याचा आरोप केला. आता एका मोडक्या घरात एकटा राहणारा अजीजी शेती करून उदरनिर्वाह करत आहे.









