महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यात त्वरीत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग अधिनियम-2005 ची अंमलबजावणी करावी, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे गुऊवारी देण्यात आला. याबाबतचे निवेदन आयोगाचे सदस्य निवृत्त न्यायमुर्ती अॅड चंद्रलाल मेश्राम, अॅङ बी. एल. सगर-किल्लारीकर व लक्ष्मण हाके यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, 2005 चे अधिनियमनचे कलम 9 (1) (क) अन्वये नागरिकांचा कोणत्याही वर्गाचा मागासवर्ग म्हणून सुच्यांमध्ये अंतर्भाव करण्याची विनंती विचारार्थ स्विकारणे व तपासणे, कलम 9 (1) (ख) अन्वये नागरिकांच्या कोणत्याही वर्गाचा, अशा सुच्यामध्ये कमी किंवा जास्त प्रमाणात अंतर्भाव झाल्याच्या तक्रारी विचारार्थं स्वीकारणे, त्यांची सुनावणी करणे, त्यांची चौकशी करणे आणि तपासणे व त्यास योग्य वाटेल असा सल्ला राज्य शासनाला देणे, कलम 9 (1) (ड) अन्वये, नागरिकांच्या मागासवर्गाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीचा नियमितपणे आढावा घेणे, आदी कामे या अधिनियमान्वये आयोगावर सोपवलेली आहेत.
आज महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गीयांकरिता 19 टक्के आरक्षण असून, त्यामध्ये अंदाजे 246 वर्गाचा समावेश करण्यात आला आहे. जरी समावेश वर्ग असा शब्द वापरला असला तरी देखील मंडल आयोगाने नेमून दिलेल्या तत्त्वांना फाटा देवून जातीचा विचार करून त्या जाती या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दि.9 ऑगस्ट, 1994 रोजीच्या एका शासन निर्णयामध्ये जवळपास 100 जाती या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या विद्यमान यादीमध्ये असण्राया वर्ग या यादीमध्ये समावेश करत असताना, त्या संदर्भातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासपण तपासले गेले नाही. तसेच त्याचा इंम्पिरिकल डेटा गोळा केला नाही. त्याचबरोबर अधिनियमचे 2005 चे कलम 9 व 11 प्रमाणे त्या याद्या तपासल्या गेल्या नाहीत. त्या याद्यांमधील समाविष्ट असण्राया वर्गाची सामाजिक, आर्थिक प्रगती चा नियमित आढावा घेतला गेला नाही. तसेच या संदर्भातील सामाजिक, आर्थिक प्रगती झालेल्या वर्गांना अशा सुच्यामधून वगळण्याची किंवा मागासवर्गाचा अशा सुच्याचा अंतर्भाव करण्याची शिफारस आयोगाने केलेली नाही. यामुळे मराठ्यांना या ओबीसी यादीमध्ये समाविष्ट केले जावू शकत नाही. कारण आरक्षणाची मर्यादा 50टक्के इतकीच आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग अधिनियम 2005 ची अंमलबजावणी ताबडतोब करावी. अन्यथा जन आंदोलन उभे केले जाईल.
शिष्टमंडळात निमंत्रक अॅङ बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, चंद्रकांत पाटील, संजय काटकर, सुनिता पाटील, राजीव लिंग्रस, अॅङ सतीश नलवडे, ऊपेश पाटील आदींचा समावेश होता.








