स्वत:च्या आईला ओळखणे मुलाला झाले कठीण
स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी कधीकधी इतका मेकअप करतात की त्यांना ओळखणे देखील अवघड ठरते. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. या महिलेला तिचेच मूल मेकअपमुळे ओळखू शकले नाही. तिच्यासमोरच या मुलाने आईची आठवण करत रडण्यास सुरुवात केली. या महिलेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाच्या रडण्याची क्यूट स्टाइल आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत एक महिला तिचा मेकअप करून तयार होत असते आणि त्याचवेळी तिचा लहान मुलगा तिचीच आठवण काढून रडत असल्याचे दिसते. ही महिला या मुलाला मीच तुझी आई असल्याचे सांगत असते, परंतु तो तो नाही म्हणत जोरजोरात रडू लागतो. मेकअप केल्यावर मुलाला त्याच्या आईला नीट ओळखता देखील आले नाही. त्याची आई त्याला समजावून सांगत असतानाही तो तिला ओळखण्यास नकार देतो आणि पळून जाते. या वेळी आई मुलाच्या जवळ जाऊन बसते आणि त्याला मांडीवर घेते तेव्हा तो एका अनोळखी स्त्राrने पकडल्यासारखे रडू लागतो असे या व्हिडिओत दिसून येते.
आई आणि मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या मजेशीर कॉमेंट्स प्राप्त होत आहेत. अशा मेकअपचा काय उपयोग ज्यामुळे मुलाला स्वत:च्या आईलाही नीट ओळखता येत नाही असे एका युजरने नमूद केले आहे. तर दुसऱ्या युजरने या मुलाला त्याची साधी भोळी आईच आवडत असल्याची मजेशीर टिप्पणी केली आहे. तर मुलाने ओळखले नाही तरी चालेल, पण मुलाच्या बाबाने तरी तिला ओळखावे अन्यथा गडबड होईल असे एका युजरने कॉमेंटमध्ये लिहिले आहे.