गुहागर / सत्यवान घाडे :
शहराला लाभलेल्या समुद्रचौपाटीबरोबर शहरातील पुरातन मंदिरामध्ये असलेली तळी ही पर्यटनासाठी केंद्रबिंदू ठरू शकतात. पावसाळ्यामध्ये ही तळी पाण्याने तुडुंब भरली आहेत. मात्र या तळ्यांची स्वच्छता व देखभाल नसल्याने आज त्यांचा वापर होत नाही. एकूण ९ तळ्यापैकी एक तळे पिण्याच्या पाण्याची तहान भागवते. मात्र उर्वरित ८ तळ्यापैकी केवळ एकाच तळ्याचा पोहण्यासाठी वापर होत आहे. अशा या तळ्याचे माहेरघर असलेल्या गुहागर शहरातील ही तळी गतवैभवाची वाट पहात आहेत. तर हीच तळी पावसाळी पर्यटनासाठी वरदान ठरू शकतात.
गुहागर शहराला तब्बत ६ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. परंतु पावसाळी पर्यटनासाठी समुद्रकिनाऱ्याचा उपयोग होत नाही. यासाठी पावसाळ्यामध्येही गुहागर शहराने वेगळे काही तरी निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्याकडे जे आहे ते जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शहरातील ९ लापांचा विबार करता एका शहरात अशाप्रकारची पुरातन तळी ही जमेजी बाजू आहे. शहरातील एकूण तळ्यांपैकी सर्वाधिक उंचावर असलेले बारटक्के तळे हे पावसाळ्यामध्ये तुटुंब मरतेः तरुण मंहकी या तळ्यावर पोहण्याचा आनंद घेत असत. आता ते प्रमाण कमी झाले आहे. मुळातच हे तळे शहरातील बारटक्के व काही कुटुंबांनी आपल्याला पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी निर्माण केलेले तळे आहे. तेवून आजही गुहागर शहरात पिण्याचे पाणी मिळते. यामुळे हे तळे पोहण्यासाठी नाही मात्र उर्वरित ८ तळ्यांचे सौंदर्य खुलवल्यास याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
- पुरातन देवस्थानासमोरील तळी लक्षवेधी
गुहागर शहरात प्रवेश करताच श्री व्याडेश्वराचे दर्शन होते. या मंदिरासमोरील भर बाजारपेठेतील तळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. या तळ्यासाठी गुहागर नगर पंचायतीच्यावतीने ११ लाख रुपये खर्च करून पांढरे मार्बल वापरून सुशोभिकरण करण्यात आले आहे. परंतु सध्याची परिस्थिती पहाता हा निधी पाण्यात गेल्यासारखेच आहे. एवढेच नव्हे तर शहर बाजारपेठ मध्यावर असलेल्या या तवधामध्ये कारंजा बसवण्याच्या घोषणा हवेतब विरल्या आहेत. तरीही या तळ्याचा पोहण्यासाठी नक्कीच वापर होऊ शकता असता. मात्र या तळ्याचा उपसा केला गेला नसल्याने तळ्याचा उपयोग शून्य आहे. पूर्वी काही हौशी मंडळी या तळ्यात पोहण्याचा आनंद लुटत होते.
खालचापाट येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामधील तळे हे सर्वाधिक सुरक्षित तळे समजले जाते. आजही या तल्धामध्ये शहरातील हौशी मंडळी पोहण्याचा आनंद लुटत आहेत. या तत्तथाचे सुशोभिकरण व सुरक्षेसंदर्भातील अधिक कामे झाली तर हे सर्वाधिक उपयोगाचे होईल. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असगोली वाळुकेश्वर मंदिराच्या मागेही तळे आहे. या तळ्याचा वापर केवळ कपडे धुण्यासाठी केला जात आहे
या तळ्याच्या सुशोभिकरणासाठीही गुहागर नगरपंचायतीने प्रस्ताव केला असून सदर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. कीर्तनवाडी येथील पारंमभट्ट नारायण मंदिरासमोरील तळेही सर्वाधिक उपयोगाचे आहे. या तळ्याचाही देवील परिसरातील तरुण मंडळी पोहण्याचा आनंद लुटत होते. हे तत्वेही दुर्लक्षित राहिल्याने आज ते वापरास अयोग्य बनले आहे. श्री आडेश्वर देवस्थानच्या माध्यमातून येथील परिसरातील स्वच्छता व डागडुजीचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच हे तळे पोहष्पात्ताठी सज्ज होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. मात्रही ९ तळी सध्या पाण्याने तुडुंब भरली असून पर्यटनाच्या नव्या मार्गासाठी खुणायत आहेत.
- सोमेश्वर तळे गाळ उपसल्यास वापरण्यायोग्य
श्री दुर्गादेवी वाडीवरील सोमेश्वर मंदिराजवळ मोठे तळे आहे. मात्र या तळ्यात मोठ्या प्रमाणात कमळे, तसेच चिखलाचे साम्राज्य आहे. दरम्यान, जिल्हा अधिकाऱ्यानी या तळ्यातील गाळ उपसण्याचाही आदेश दिला होता. मात्र अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही गुहागर नगरपंचायतीने सदर कळे सुशोभिकरणाचा प्रस्तावही केला आहे. मात्र सुशोभिकरण व गाळ उपशाचे गेली दहा वर्षे झेल बडवले जात आहेत. गुहागरच्या मच्छीमार्केटशेजारी असलेले तळेही पूर्वी पोहण्यासाठी वापरले जात होते. मात्र या तळ्यांचा गाळ उपसला नसल्याने हे तळे वापरास योग्य नाही.
- सर्वांत मोठे तळ
वरचापाट श्री दुगदिवी मंदिराच्या आचारात असलेले तळे सर्वात मोठे तळे आहे. या तळ्यामध्ये काही वर्षांपूर्वी पोहण्याच्या स्पर्धाही भरवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या या तळ्याच्या सुरक्षेसंदर्भात दुर्लक्ष असल्याने है तो वापरास अयोग्य बनले आहे. हे तळेही सर्वाधिक वापरात येऊ शकते. वरचापाट येवील श्री दत्तमंदिर आवारातही तळे आहे. त्यामध्येही गाळ असल्याने त्याचा वापर कोणीही करत नाही.
- तर पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल!
शहरामध्येव तब्बल ९ छोटी मोठी तळी आहेत. शहरात तत्ही असूनही केवळ उपसा न झाल्याने आज ती ठिकाणे दुर्लक्षित ठरत आहेत. शहरवासियांना लही असूनही तळ्यांचा उपभोग घेता येत नाही तत्तेच शहर पर्यटकांसाठी खास आकर्षगाचे शहर असताना शहरातील ९ तळ्यांचा गाळ उपसून त्याचे सुशोभिकरण झाले तर नक्कीच पावसाळ्धामध्ये शहरवासियांबरोबर पर्यटकांनाही पर्वणीच ठरेल शहरात स्विमींग पूल नसले तरी या तळ्यांची एकूण रचना व तेथील निसर्गरम्य परिसर स्विमीग पुलापेक्षाही सर्वोत्तम आहे.








