246 शस्त्रs, बूट, हेल्मेट, जॅकेट्स जमा : मणिपूरच्या राज्यपालांनी दिला होता अल्टिमेटम
वृत्तसंस्था/इंफाळ
मणिपूरमधील मैतेई गटाच्या अरामबाई टेंगगोलच्या सदस्यांनी शस्त्रs जमा करण्याची अंतिम मुदत संपण्यापूर्वी गुरुवारी राज्य सरकारला 246 शस्त्रs जमा केली. शस्त्रs आत्मसमर्पण करण्यापूर्वी या गटाने मंगळवारी राज्यपाल अजय भल्ला यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी शस्त्रs आत्मसमर्पण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर शस्त्रांसह सुरक्षा जवानांकडील इतर वस्तू जमा केल्या.
बेकायदेशीर शस्त्रांसोबतच मैतेई गटाने दंगलीत वापरलेले सुरक्षा दलांचे हेल्मेट, बूट, गणवेश आणि जॅकेट देखील आत्मसमर्पण केले. मणिपूरमध्ये दीर्घकाळ चाललेल्या वांशिक हिंसाचाराचा अंत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सर्व समुदायांना सात दिवसांच्या आत त्यांचे लुटलेले आणि बेकायदेशीरपणे बाळगलेले शस्त्रs आणि दारूगोळा स्वेच्छेने परत करण्याचे आवाहन केले होते. आत्मसमर्पणाची अंतिम मुदत संपण्यापूर्वीच मैतेई गटाने त्यांची 246 बेकायदेशीर शस्त्रs परत केली आहेत.
पुनरुज्जीवनवादी सांस्कृतिक संघटनेच्या अराम्बाई टेंगगोलच्या पथकाने त्यांचे कमांडर-इन-चीफ टायसन नगांगबाम उर्फ कोरोंगानबा खुमान, जनसंपर्क अधिकारी रॉबिन मंगांग खवैरकम आणि इतर दोघांनी मंगळवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. बंद दाराआड सुमारे एक तास चाललेल्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी सामोपचाराचे धोरण स्वीकारले होते. राज्यपालांनी बेकायदेशीरपणे ठेवलेली शस्त्रs परत करण्याची विनंती केली. तथापि, काही अटी आणि शर्ती घातल्याचे बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले.
सात दिवसांचा अल्टिमेटम समाप्त
20 फेब्रुवारी रोजी राज्यपाल अजय भल्ला यांनी राज्यातील सर्व समुदायातील लोकांना सात दिवसांच्या आत लुटलेली बेकायदेशीर शस्त्रs परत करण्याचे आवाहन केले होते. हा अल्टिमेटम 27 रोजी संपला असून आता राज्यपाल काय करतात हे पहावे लागेल. यापूर्वी बेकायदेशीर शस्त्रs जमा करणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, अशी हमी राज्यपालांनी दिली होती. 3 मे 2023 रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून, बिष्णुपूर आणि चुराचंदपूरच्या सीमेवर असलेल्या तोरबांग या गावात शस्त्रागार, पोलीस ठाणी, चौक्या आणि इतर सुविधांमधून शस्त्रs लुटली होती. आतापर्यंत 6,000 हून अधिक शस्त्रs लुटण्यात आल्याचे निदर्शनास आले असून सुमारे 2,500 शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत.









