The location of the weekly market should not be shifted without taking the hawkers into confidence – Adv Sandeep Nimbalkar
फेरीवाल्यांना विश्वासात घेतल्याशिवाय सध्या भरत असलेल्या ठिकाणचा आठवडा बाजार हलावण्यात येऊ नये अशी मागणी फेरीवाला संघटनेने शुक्रवारी मोर्चा काढून नगरपालिकेकडे गेले आहे एडवोकेट संदीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला .त्यानंतर पालिकेला निवेदन देण्यात आले .आठवडा बाजाराची जागा आजपर्यंत नगरपालिका प्रशासनाने फेरीवाल्यांना विचारात न घेता बदललेली आहे. .इथला आठवडा बाजार हा ग्राहकांना सोयीचा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून एसटी स्टँड देखील जवळ आहे. त्यामुळे इथल्या आठवडा बाजाराला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जर आठवड्या बाजाराची जागा बदलून गैरसोयीची, वाहतुकीची अडचण, जिथे ग्राहक येत नाहीत. अशा ठिकाणी जर आठवडा बाजार गेला तर तिथे कोणी ग्राहक येणार नसून व्यापाऱ्यांना उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे याचा योग्य विचार करून निर्णय घ्यावा यासाठी आज मोर्चा काढण्यात आल्याचे संदीप निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी विविध मागण्या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
सावंतवाडी / प्रतिनिधी









