खानापूर प्रतिनिधी : नेरसा जवळील गवळी वाड्यात अंगणवाडी शाळेच्या बाहेर आवारातील झाडाला एक दिवसाचे बालक प्लास्टिक पिशवीत अडकवण्यात आले होते. रडण्याचा आवाज पाहून स्वयंपाक करणाऱ्यांनी जाऊन पाहिले असता, एक दिवसाचे बाळ प्लास्टिक पिशवीत अडकवण्यात आले होते.
http://View Post https://tarunbharat.com/sonalis-death-is-a-premeditated-murder
त्यांनी तात्काळ आशाताईंना कळवले याऩतर ग्रामपंचायत सदस्य रणजित देसाई, अश्विनी देसाई, आशाताईं सत्यवती देसाई यांनी या बाळाला घेऊन खानापुरात सरकारी दवाखान्यात दाखल केले . येथे प्राथमिक उपचार करून या बाळाला बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शीशु संगोपन केंद्र पाठवण्यात आले आहे. याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात 317 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच बाळची प्रकृती चांगली असून पुढील प्रक्रियेनंतर स्वामी विवेकानंद दत्तक केंद्रात या बाळाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती येथील सीडीपीओनी तरुण भारतचशी बोलताना दिली .