परळी प्रतिनिधी
संतांचे साहित्य त्यांचे विचार हे मानवी जीवनाला प्रेरणादायी असतात. त्यांच्या काव्यातून श्लोकातून, अभंगातून जे उपदेश मिळत असतात त्या उपदेशाचे आचरण केल्यास आपला मानवी जीवन हे सार्थकी लागते असे प्रतिपादन आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी सज्जनगड येथे वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळा व उत्कृष्ट कीर्तनकार सेवा पुरस्कार प्रसंगी केले.
सज्जनगडावरील समर्थ सेवा मंडळाच्या भक्तनिवास येथे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राचा अकरावा वर्धापन दिन तसेच पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू(भैया) भोसले समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाहक स.भ.योगेश बुवा रामदासी, ह.भ.प बाबा महाराज गजवडीकर, ह.भ.प अशोक बाबा नलवडे, ह.भ.प अप्पासो गायकवाड, ह.भ.प संभाजी महाराज शेळके, ह.भ.प अंकुश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
आमदर शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, रामदासी संप्रदाय वारकरी सांप्रदाय अथवा अन्य संप्रदाय असो या सर्वांनी मिळून समाजाला संत साहित्य देऊन मार्गदर्शन केले आहे त्यांच्या श्लोकातून अभंगातून समाजाला नवचेतना प्राप्त होते.”मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा” छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकालात अनेक संत महंत मठपती वारकरी सर्व एकत्रित येऊन समाजाला दिशा देत होते. हेच कार्य यापुढे अनेक अध्यात्मिक संस्था करत आहेत कीर्तनकार प्रवचनकार हा व्यवसाय नसून यातून समाजाला प्रबोधन केले जाते कोबी अभंग मनाचे श्लोक यातून मनोरंजन नव्हे तर थोडक्यात शब्दात आपले आचरण कसे असावे समाजापुढे कसे प्रकट व्हावे हे शिकवले जाते या कार्यासाठी नवनवीन कीर्तनकार प्रवचनकार तयार झाले पाहिजे.
याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते बाबा महाराज गजवडीकर,रवींद्र महाराज, लोहार संभाजी महाराज शेळके, संतोष महाराज ढाणे यांना उत्कृष्ट कीर्तनकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाहक योगेश व रामदासी यांनी रामदासी संप्रदायाची माहिती देत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा शाल व समर्थ प्रसाद देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प राम महाराज कदम यांनी केले होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









