ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या या गटाला कोणती खाती मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच या मंत्र्यांच्या संभाव्य खात्यांची यादी समोर आली आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांना महसूल खातं, हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्यांक आणि कामगार खातं, छगन भुजबळ यांना ओबीसी आणि बहुजन विकास, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय खातं तर दिलीप वळसे-पाटील यांना सांस्कृतिक आणि कृषि खातं मिळणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने समोर आणली आहे. दरम्यान, या आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आदिती तटकरे, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांना कोणतं खातं मिळणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.








