दांडेली-अंबिकानगर मार्गावरील घटना
प्रतिनिधी / दांडेली
दांडेली-अंबिकानगर रस्त्यावर मोहिनी सर्कलजवळ बिबटय़ाने गायीची शिकार बुधवार दि. 17 रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान केली. या शिकारीचा व्हिडिओ क्रूझर चालक दीपक यांनी केला आहे.
क्रूझर चालक दीपक हे प्रवाशांना दांडेली येथे घेऊन येताना मोहिनी सर्कल येथे बिबटय़ाने गायीच्या नरडीचा घोट घेत ठार करून जवळच्या झुडुपात ओढून नेले.
दांडेली अरण्य परिसरात बिबटय़ांची संख्या वाढली आहे. गाय, वासरु, कुत्रे, पाळीव डुकरे यांची शिकार बिबटे करत आहेत. दांडेली शहराचा काही भाग अरण्यास लागून येतो. यामध्ये बैलपार, कोगिलबन, जुने दांडेली, अंबेवाडी, गांधीनगर या भागातील रात्रीच्यावेळी अनेक कुत्री गायब होत आहेत. यांची शिकार बिबटय़ाच करत आहेत, असे नागरिकांचे मत आहे.









