नव्या तारखेची घोषणा : भारतीय अंतराळवीराचा मोहिमेत समावेश
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
नासा आणि इस्रोच्या ‘अॅक्सिओम-4’ मिशनला प्रक्षेपित करण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ही मिशन गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकासाठी (आयएसएस) रवाना होणार होती, परंतु आता 22 जून रोजी हे प्रक्षेपण होणार आहे.
आयएसएसच्या ज्वेदा सेवा मॉड्यूलच्या मागील हिस्स्यात दुरुस्तीचे काम सुरू होते. अशास्थितीत नासा अंतराळस्थानकाचे मूल्यांकन केल्यावरच अॅक्सिओम-04 मिशनला प्रक्षेपित करणार आहे.
इस्रो, नासा, अॅक्सिओम स्पेस आणि स्पेसएक्सच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम प्रक्षेपित केली जाणार आहे. हे प्रक्षेपण काही दिवसांपूर्वी पार पडणार होते, परंतु फाल्कन 9 रॉकेटमध्ये लिक्विड ऑक्सिजन गळतीनंतर ही मिशन 19 जूनसाठी टाळण्यात आली होती. आता ही मिशन 22 जून रोजी प्रक्षेपित होणार आहे.
मोहिमेत कोण-कोण सामील?
नासाचे माजी अंतराळवीर आणि ह्यूमन स्पेसफ्लाइटचे संचालक पॅगी व्हिटसन या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. तर इस्रोचे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला कमांडर म्हणून या मिशनमध्ये सहभागी असतील. याचबरोबर युरोपीय अंतराळ संस्थेच्या मिशन स्पेशलिस्ट स्लावोज उज्नान्स्की विस्निवेस्की आणि टिबोर कापू हे वैद्यकीय आणि सुरक्षा मापदंडांचे पालन सुनिश्चित करतील.
फ्लोरिडातून होणार प्रक्षेपण
या मिशनला नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केले जाणार आहे. स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान सर्व अंतराळवीरांना आयएसएसपयर्तं नेणार आहे.
भारतासाठी मोहीम खास
ही मोहीम भारतासाठी अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे. 1984 नंतर अंतराळात पोहोचणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय ठरतील. या मोहिमेदरम्यान शुक्ला हे नासासोबत मिण्tन 7 प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करतील. शुक्ला यांचा हा अनुभव इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी सहाय्यभूत ठरणार आहे.









