सेन्सेक्स 462 अंकांनी मजबूत : निफ्टीही वधारली
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी देशातील बाजारात शुक्रवारी सलग दुसऱया दिवशी तेजीचा कल राहिला होता. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 462.26 अंकांनी मजबूत होत निर्देशांक बंद झाला आहे. प्रमुख क्षेत्रांपैकी बँक, आर्थिक आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागात झालेल्या लिलावामुळे बाजाराला समर्थन मिळाल्याचे दिसून आले.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 462.26 अंकांनी वधारुन निर्देशांक 52,727.98 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 142.60 अंकांनी वधारत जात 15,699.25 वर बंद झाल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा स्टीलचे समभाग लाभासह बंद झाले आहे. अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा , इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, विप्रो आणि सन फार्मा यांचे समभाग घसरणीसह बंद झाला आहे.
जागतिक बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारात जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग, व चीनचा शांघाय कम्पोजिट व दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे लाभात राहिले होते. युरोपीयन बाजारात दुपारपर्यंत तेजी राहिली होती.
जागतिक बाजारांमधील मजबूत स्थिती व अन्य घटकांमधील किमतीत आलेल्या घसरणीमुळे देशातील शेअर बाजारात सकारात्मक कल राहिला होता. माहिती तंर्ज्ञानाचे समभाग वगळता अन्य क्षेत्रातील समभागात लिलावाला समर्थन मिळाल्याचे दिसून आले.
याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 1.11 टक्क्यांनी वधारुन 111.27 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते. तर विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा बाजारातून 2,319.06 कोटी रुपये मूल्याच्या समभागाची विक्री केली आहे.









