The last darshan of Anil Parulekar’s body was taken by people from social and political fields
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांचे गुरुवारी निधन झाले परुळेकर यांचे पार्थिव माटेवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. गुरुवारी जिल्हाभरातील शेकडो दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली उपरलकर स्मशानभूमी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे परब तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळा गावडे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार तालुकाप्रमुख रुपेश राऊळ मायकल डिसोजा सामाजिक कार्यकर्ते नकुल पारसेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पी ए गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर तसेच मंगेश तळवणेकर संजु शिरोडकर ,उमेश कोरगावकर ,आनंद नेवगी ,विलास सावंत, रवी जाधव यांच्यासह शेकडो नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले.
सावंतवाडी / प्रतिनिधी









