खेड :
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या दरडीसह मातीचा भराव तिसऱ्या दिवशीही ‘जैसे थे’ होता. कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून सर्व वाहने धावत असल्याने घाटाकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे.
धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे महामार्गावरील घाटात दरडींसह दगड व मातीचा भराव रस्त्यावर कोसळत आहे. बोगद्यातील वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्यानंतर पर्यायी घाटाचा वाहतुकीसाठी वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मार्गावर कोसळलेली दरड तातडीने बाजूला हटवून मार्ग सुस्थितीत आणण्याची मागणी कशेडी येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद मोरे यांनी केली आहे.








