दिनांक 31-07-2022 ते 6-8-2022
मेष
अत्याधिक राग आणि लोभ यापासून दूर राहणेच ठीक आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रमाणाच्या बाहेर राग येऊ शकतो. मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये गैरसमज पसरू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. मान सन्मान वाढेल. पैशांच्याबाबतीत भाग्यवान असाल. अपेक्षा नसताना एखाद्या ठिकाणाहून पैसे मिळू शकतात. प्रेमींनी आणि विवाहित लोकांनी आपल्या पार्टनरचा सन्मान करावा.
दिव्यांग व्यक्तीला निळे फूल भेट द्यावे
वृषभ
या आठवडय़ामध्ये कामावर अत्याधिक लक्ष देणे गरजेचे असेल. भावनांपेक्षा कर्तव्याला महत्त्व द्यायला हवे असा टॅरोचा संदेश आहे. जर संपूर्ण मन लावून काम केले तर कुठलेही लक्ष्य अशक्मय नाही हे तुम्हाला कळेल. या आठवडय़ात काही बदल होतील. हे बदल कामाच्या ठिकाणी किंवा कामाच्या स्वरूपात असू शकतात. काही माणसांकडून अपेक्षाभंग होण्याचीदेखील शक्मयता आहे.
पांढरा हातरुमाल जवळ ठेवावा.
मिथुन
या आठवडय़ामध्ये गुंतवणुकीतून फायदा होण्याचे संकेत आहेत. ही गुंतवणूक पैशांची किंवा भावनांची असू शकते. मैत्रीपूर्ण वातावरणात कामे पूर्ण होतील. एखाद्या नातेवाईकाला मदत करण्याची संधी मिळेल. पण याबरोबरच एक धोक्मयाचा इशारा असा आहे जवळच्या एका माणसाकडून मानहानी किंवा दगाबाजी होऊ शकते. आर्थिकदृष्टीने उत्तम असा काळ आहे.
कच्चा नारळ पाण्यात सोडावा.
कर्क
कामाच्या ठिकाणी अधिकार प्राप्तीचे संकेत आहेत. एखादे काम जबाबदारीने पूर्ण कराल. पण ते करत असताना हवा तितका सहयोग इतरांकडून मिळणार नाही. त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवू नका. एखादी अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत समाधानी असाल. वैवाहिक जीवनामध्ये ताणतणावाबरोबर एकमेकाला मदत करण्याची भावनाही उत्पन्न होईल.
जांभळय़ा रंगाच्या फुलांना धार्मिक ठिकाणी सोडावे.
सिंह
या आठवडय़ात बरेच निर्णय चुकण्याची शक्मयता आहे. त्यामुळे परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून आकलन करून मगच कृती करावी. योग्य आणि अयोग्य यातील फरक नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे कारण याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. जवळच्या एखाद्या माणसाला खुश करण्याकरता प्रयत्न कराल. समृद्धी आणि पैशांच्या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही.
पिवळा हात रुमाल जवळ ठेवावा.
कन्या
आठवडय़ासाठी टॅरोचा संदेश असा आहे की तणावाखाली केलेले कुठलेही काम चुकू शकते. याकरता पूर्ण आत्मविश्वासाने कामे करावीत. असफलतेला सफलतेमध्ये बदलण्याची धमक तुमच्यात आहे हे ध्यानी घ्या. कामाचा वेग वाढवण्याची गरज आहे. वेळ पुरणार नाही याकरता टाईम मॅनेजमेंट गरजेचे असेल. नात्यांमध्ये कटुता निर्माण होईल असे वागणे आणि बोलणे टाळावे.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्यावे.
तुळ
या आठवडय़ात लोकांशी किंवा जवळच्या माणसांशी मतभेद किंवा भांडण होऊ शकते. व्यर्थ बाचाबाची करण्यापासून दूर रहा. एखादी कृती अनेकदा करावी लागू शकते. कामाच्या नवीन संधी मिळतील त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. सन्मान प्राप्तीचे संकेत आहेत. आरोग्याच्यादृष्टीने हा आठवडा उत्तम असेल. कामाच्या ठिकाणी योग्य व्यक्तीचा सल्ला मिळाल्यामुळे फायदा होईल.
तांब्याचे कडे घाला .
वृश्चिक
सावध राहिल्यास अनेक प्रकारचे नुकसान टळू शकते. गरज आहे ती परिस्थितीला नीट समजून घेण्याची आणि लोकांना पारखण्याची. काही बाबतीत आर्थिक हानी संभवते तर काही वेळेला नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत. मातृतुल्य व्यक्तीची मदत मिळेल. परिवाराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी येईल. लहान भावाची काळजी वाटेल. मित्रांकडून लाभ संभवतो.
गायीच्या खुराखालील माती जवळ ठेवावी.
धनु
अति आत्मविश्वास आणि अति घाई यामुळे होणारी कामे होता होता राहू शकतात. घरातील जबाबदाऱयांमुळे कामाकडे लक्ष कमी होऊ शकते. आणि दुसरे याचा फायदा उचलू शकतात. त्यामुळे सतर्क राहून आजूबाजूच्या लोकांवर जास्त विश्वास न ठेवलेला बरा. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसाधारण असेल. एखादी व्यक्ती मन दुखावू शकते. कौटुंबिक जबाबदाऱया वाढणार आहेत. धार्मिक पुस्तकाचे दान करावे.
मकर
तब्येतीच्या चढ-उतारामुळे त्रस्त व्हाल. एखादा अनपेक्षित आजार त्रास देऊ शकतो. परिवारातील सदस्यांपुढे आपले म्हणणे मांडण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडू शकता. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसामान्य असेल. अनावश्यक बाबतीत मत व्यक्त करू नका.
जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करा.
कुंभ
तब्येतीला विशेष करून जपावे लागेल. कुपथ्याचा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी चुकीच्या माहितीमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान होऊ शकते. पारिवारिक संबंध चांगले राहतील. पैशांच्या देवाण-घेवाणीमध्ये सावध रहावे. प्रेमीजनानी भावना समजून घ्याव्यात.
अशोकाची तीन पाने जवळ ठेवावीत.
मीन
तब्येतीच्या तक्रारी दूर झाल्याने समाधान वाटेल. जुनी येणी वसूल होतील. परिवारात मंगलकार्य घडू शकते. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल. करमणुकीकडे कल असेल. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. भाग्याची साथ मिळेल. दुरून शुभ सूचना मिळू शकतात.
सोमवारी पांढऱया मिठाईचे दान कामगार वर्गाला करावे.
टॅरो उपायः एखादी अडचण आली किंवा संकट आले तर घाबरून न जाता 6 बाय 5 च्या लाल कपडय़ामध्ये 1 दालचिनीची काडी, 2 लवंगा, 2 वेलदोडे बांधून ही पोटली उशाखाली ठेवावी. मार्ग मिळतो.





