दि. 18-9-2022 ते 24-9-2022 पर्यंत
मेष
नवीन प्रोजेक्ट मिळतील, नवीन कामांमध्ये हातही घालाल, लोक सहकार्यदेखील करतील पण गरज आहे ती कष्टांचे प्रमाण वाढवण्याची. गेल्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही निराश झाला असाल तर आशादायक वातावरण तयार होणार यात शंका नाही. याचबरोबर जर वैवाहिक जीवनामध्ये ताण तणावाला सामोरे जात असाल तर या तणावापासून मुक्ती मिळणार हे नक्की.
औदुंबरला प्रदक्षिणा घालाव्या
वृषभ
इतके दिवस ज्या गोष्टींची वाट बघत होता त्या गोष्टींची सुरुवात होण्याची वेळ आलेली आहे. पण ही सुरुवात जुन्या काही गोष्टींना संपवून होईल हेही लक्षात ठेवायला हवे. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. तब्येतीच्या बाबतीमध्ये निश्चिंत असाल. आर्थिक समाधान प्राप्त होईल. काही बाबतीमध्ये नको त्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे मनस्ताप होण्याची शक्मयता आहे.
अशोकाच्या झाडाची तीन पाने जवळ ठेवावी.
मिथुन
काही घटना अशा घडू शकतात की ज्यामध्ये तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. काही व्यक्ती धडा शिकवतील तर तुम्ही काही बाबतीमध्ये स्वतः अनुभव घेऊन शहाणे व्हाल. या आठवडय़ामध्ये कोणावरही विश्वास करत असताना दहादा विचार करावा. आर्थिक बाबतीत सावधान असावे. चुकीच्या खान पानाचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो.
मुंग्यांना साखर घालावी
कर्क
कामाचे प्रेशर आणि कौटुंबिक जबाबदारी यात संतुलन साधण्याचा प्रयत्न कराल. मागे झालेल्या भांडणांचा परिणाम सध्याच्या कामावरती होऊ शकतो. अती- आत्मविश्वासामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे एखादी चूक घडू शकते त्यामुळे सावध राहावे. कुटुंबातील व्यक्तींकरता खर्च कराल. कामाच्या ठिकाणी आशादायक वातावरण असेल. आर्थिक आवक उत्तम असेल.
पांढरे काजळ लावावे
सिंह
तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये आत्मविश्वास झळकेल. लोकांशी संवाद साधत असताना तुमच्या वाणीचा प्रभाव लोकांवर पडेल. व्यावसायिक निर्णय अचूक ठरतील. कामाच्या ठिकाणी स्वार्थ साधाल. आर्थिक आवक उत्तम असेल. प्रकृतीच्या बाबतीमध्ये हेळसांड करू नका. एखादी जवळची व्यक्ती आश्वासन तोडू शकते. एखादी व्यक्ती कळत नकळत अपमान करण्याचा प्रयत्न करेल.
लाल हातरुमाल जवळ ठेवावा
कन्या
तुमच्यामधील आशेला जिवंत ठेवा. सध्याचा काळ हा थोडा आत्मपरीक्षणाचा आणि स्वप्नांकरता कृती करण्याचा आहे. नशीब तुमची साथ देईल. या आठवडय़ात काहीतरी नाविन्यपूर्ण घटना घडतील. या घटना वैयक्तिक किंवा सामाजिक दोन्ही स्वरूपाच्या असू शकतात. मागच्या काळामध्ये तब्येत बिघडली असल्यास सुधारण्याचे संकेत आहेत. कोणतीही बातमी सत्य आहे की असत्य हे पाहून निर्णय घ्या.
अन्नदान करावे
तूळ
खऱया अर्थाने येणारा आठवडा हा आत्मपरीक्षणाचा आहे. पूर्वी केलेल्या चुका आणि आत्ता करत असलेली कर्म यांचा थेट संबंध भविष्याशी असतो याची जाणीव करून देणारा काळ असेल. कोणतेही काम करत असताना सावध रहावे असा संदेश आहे. काही बाबतीमध्ये बदल घडतील आणि ते कायमचे असतील. आर्थिक गुंतवणूक करताना जवळच्या व्यक्तीचे मत विचारात घ्या.
केळीच्या झाडाचे मूळ जवळ ठेवावे
वृश्चिक
खऱया अर्थाने या आठवडय़ामध्ये नशीबवान कार्ड तुमच्या राशीचे आले आहे. बऱयाच गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह बदल घडतील. काही कारणाने तब्येत बिघडली असेल तर ती पूर्वपदावर येईल. बिजनेसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जर मागील काही दिवसात नुकसान झाले असेल तर या आठवडय़ामध्ये बऱयापैकी रिकव्हरी होईल. मित्रांची आणि घरातील सदस्यांची साथ मिळेल.
आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालावी
धनु
तुम्ही करत असलेल्या कामाला कौटुंबिक आणि सामाजिक मान्यता मिळेल. बऱयाच वेळेला लोकांच्या अडीअडचणींना सोडवावे लागेल. त्यात वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होऊ शकतो. काही वेळेला अशी अनुभूती येईल की मदत करूनसुद्धा लोक त्याची जाणीव ठेवत नाहीत. नात्यासंबंधी काही नवीन माहिती समोर येईल. कामे पूर्ण करण्याकरता दुसऱयाची मदत लागू शकते.
गाईला हिरवा चारा घालावा
मकर
सर्वसाधारणपणे संमिश्र परिणाम देणारा हा आठवडा असेल. काही ठिकाणी मेहनत जास्त आणि फळ कमी असा अनुभव येईल. लहान-मोठी कामे करत असताना सुद्धा दमछाक होण्याची शक्मयता आहे. या आठवडय़ामध्ये आईचा किंवा आईसारख्या व्यक्तीचा तुमच्यावर प्रभाव राहील. कामधंद्याच्या बाबतीमध्ये शुभ संकेत देणारे इशारे मिळतील. अतिविश्वास घातक ठरू शकतो.
मुंग्यांना साखर घालावी
कुंभ
सकारात्मक परिणाम देणारे संकेत मिळत आहेत. पूर्वीच्या कटू अनुभवांना विसरून नव्या पद्धतीने कामे करण्याची गरज आहे. येणाऱया संधीचे सोने कराल. कामाच्या ठिकाणी छोटे-मोठे बदल करावे लागतील. नवीन ओळखींमधून फायदा होण्याची शक्मयता आहे. मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण साजरे कराल. आर्थिक आवक उत्तम असेल. जास्त रिस्क घेऊ नये.
मातीचे पात्र दान द्यावे
मीन
या आठवडय़ामध्ये स्त्री वर्गाचा आपल्यावर प्रभाव असेल. खासकरून एखाद्या ज्ये÷ स्त्रीचा सल्ला वैयक्तिक आणि व्यावसायिक संकटामधून बाहेर काढू शकतो. कुटुंबीयांच्या आणि मित्र परिवाराच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढतील पण त्या पूर्ण करताना तुमची दमछाक होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीमध्ये येणाऱया संधींना चुकवू नका.
पिवळा हात रुमाल जवळ ठेवावा.
टॅरो उपायः दर अमावास्येला संध्याकाळी पिंपळाजवळ हळदीने पिवळे केलेल्या तांदळावरती चार मुखी दिवा लावावा. एका कागदावर दहिभात ठेवून पितरांची मनोभावे प्रार्थना करावी. घराण्यातील सगळे दोष नाहीसे होतात.




