दिनांक 04-09-2022
मेष
कर्तृत्वाला झळाळी मिळण्याची वेळ येत आहे. संधीचे सोने करायला विसरू नका. रागावर नियंत्रण ठेवल्यास नात्यांमध्ये कटुता येणार नाही. कुटुंबाकरता खर्च कराल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे असेल. एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी इतरांचे सहकार्य घ्यावे लागेल. प्रेमीजन एकमेकांच्या सहवासात रमून जातील. आर्थिक आवक समाधानकारक असेल.
केळीचे झाड लावावे.
वृषभ
देणाऱयाने देत जावे घेणाऱयाने घेत जावे अशी काहीशी परिस्थिती असेल. या आठवडय़ामध्ये तुमच्या हातून दानधर्म घडेल. त्याचबरोबर एखादी ज्ये÷ व्यक्ती तुम्हाला उपहारस्वरूप काही देऊ शकते. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. नवीन खरेदीचे योग आहेत. तुमच्याविरुद्ध षड्यंत्र रचणाऱयांची तोंडे बंद होतील. कौटुंबिक वातावरणामध्ये आनंद असेल. भाग्योदय घडेल.
दिव्यांगाना आर्थिक मदत करावी.
मिथुन
आर्थिक बाबतीमध्ये सावध राहण्याची गरज आहे. एखादी व्यक्ती आश्वासन देऊन सुद्धा ते न पाळल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाने वेळ घालवाल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचा परतावा मिळेल. प्रेमींना उपहार प्राप्ती होईल.
सायंकाळी कर्पूर होम करावा.
कर्क
जितके द्याल तितके जास्त मिळेल. पैशांच्याबाबतीत गाफिल राहून चालणार नाही. तब्येतीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न कराल. कुटुंबातील व्यक्तींना तुमच्या मदतीची गरज असेल. मित्रांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची अपेक्षा करू नका. एखादा दूरचा नातेवाईक भेटू शकतो. प्रेमीजनांनी आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी.
धार्मिक पुस्तकांचे दान करावे.
सिंह
घरात छोटेखानी समारंभ साजरा कराल. फोनवरून चांगली बातमी मिळण्याची शक्मयता आहे. तुमच्या स्वभावातील अभिमानाला थोडी मुरड घालण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे. काही बाबतीमध्ये द्विधा मनस्थिती होण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी पक्षपात झाल्यामुळे मन उदास होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. प्रेमींनी गैरसमजाला थारा देऊ नये.
जांभळा हातरुमाल जवळ ठेवावा.
कन्या
आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश प्राप्ती बरोबरच कौतुकही होईल. बरोबर काम करणाऱया लोकांवरती अति विश्वास ठेवू नका. कुटुंबातील वातावरणामध्ये नवचैतन्य आणण्याची गरज आहे. सध्याचे काहीसे कंटाळवाणे वातावरण बदलेल. अपेक्षा नसताना एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळण्याची शक्मयता आहे. धनप्राप्ती उत्तम राहील.
जनावरांसाठी खाण्याची सोय करावी.
तूळ
करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी काहीशी परिस्थिती असण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कुठलेही काम करण्याच्या अगोदर दोनदा विचार करावा. आर्थिक प्राप्ती अपेक्षेप्रमाणे राहील. एखादा निश्चय कराल. जे÷ व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. कागदोपत्री व्यवहारातून एखाद्या व्यक्तीबरोबर भांडण होण्याची शक्मयता आहे.
हळदीचा टिळा लावावा.
वृश्चिक
तुमच्या आतल्या आवाजाला ओळखण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची वेळ आता आलेली आहे. आर्थिक बाबतीमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी पुढच्या दृष्टीने ते योग्य ठरतील याची खात्री बाळगा. पैशांच्या बाबतीमध्ये समाधान मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची चिंता होऊ शकते, नातेवाईकांची भेट होऊन एखाद्या गोष्टीवर चर्चा कराल.
हरभरा दान करावा.
धनु
पैशांची आवक उत्तम असेल पण त्याचबरोबर खर्चाचे प्रमाणही वाढलेले दिसत आहे. कुटुंबासाठी आणि घरासाठी खर्च कराल. तो खर्च अवाजवी असू नये याची काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या कामासाठी बाहेर जावे लागू शकते. एकंदर हा काळ समाधानाचा आणि आनंदाचा असेल. या सगळय़ामध्ये तब्येतीची काळजी घ्यायला विसरू नका. छोटा मोठा आजार त्रास देऊ शकतो.
गूळ दान द्यावे.
मकर
सणासुदीच्या वातावरणामध्ये मनावर नैराश्याचे सावट येऊ देऊ नका. काही गोष्टींचा त्रागा होईल पण समस्या सुटणार आहेत याची खात्री बाळगा. एखादे महत्त्वाचे सामान हरवू शकते. पण लवकरच ते परत मिळेल. कामाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी प्रवास होऊ शकतो. नातेवाइकांकडून एखादी चांगली खबर मिळण्याची शक्मयता आहे. या काळात तुमचे साहस वाढवण्याची गरज आहे.
मुंग्यांना साखर घालावी.
कुंभ
तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात त्यापेक्षा आपण केलेली प्रत्येक कृती बरोबर आहे का त्याचा विचार करावा. येणाऱया आठवडय़ामध्ये तुमचा उत्साह वाढवणाऱया काही घटना घडतील. घरातील लोकांकडून प्रोत्साहन मिळेल. एखादे राहिलेले काम पूर्ण होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. वैवाहिक जीवनामध्ये आनंद असेल. पैशाची आवक उत्तम असेल.
नारळाच्या झाडाला पाणी घालावे.
मीन
तुमच्या कष्टांचा परतावा आर्थिक आणि कौतुकाच्या स्वरूपात होईल. बरोबर काम करणाऱया लोकांवरती जास्त विश्वास न ठेवता आपल्या वरि÷ांकडे योग्य ती माहिती पोहोचेल याची काळजी घ्यावी. व्यावसायिकांना नियोजनबद्ध काम करण्याची गरज आहे. कुटुंबातील व्यक्ती एकत्र येऊन आनंद साजरा करतील. वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण होतील.
काळय़ा गाईची सेवा करावी.
टॅरो उपायः
कोणीतरी विनाकारण त्रास देत असेल तर कांद्याचे टरफल, लसणाची साल आणि तीन काळय़ा मिऱया हे साहित्य खलबत्त्यात चेचावे. चेचत असताना त्या व्यक्तीचा चेहरा डोळय़ासमोर आणावा. नंतर ती पूड निखाऱयांवर घालावी.









