दि. 13-11-2022 ते 19.11.2022
मेष
भाग्याची उत्तम साथ असली तरी कष्टाला पर्याय नाही. भविष्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन कराल. काही चांगल्या संधी प्राप्त होतील पण त्यातून फायदा किती होईल हे तुमच्यावर अवलंबून असेल. मित्रांची साथ मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. आरोग्याच्या छोटय़ामोठय़ा तक्रारी त्रास देऊ शकतात.
वैवाहिक जोडीदाराला अत्तर भेट द्यावे
वृषभ
जैसी करनी वैसी भरणी हा कर्माचा सिद्धांत लक्षात ठेवून काम केल्यास उत्तम रिझल्ट मिळतील. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवल्यास अवघड वाटणारी कामेसुद्धा पूर्ण कराल. या आठवडय़ात घडणाऱया काही घटनांमुळे मन विचलित होऊ शकते. जवळच्या एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडल्याने कामे सोडून तिकडे लक्ष द्यावे लागेल. या गडबडीत स्वतःची तब्येत सांभाळा.
अंघोळीच्या पाण्यात दही घालून स्नान करावे
मिथुन
एखाद्या व्यक्तीचा सल्ला कामी येऊन आर्थिक फायदा होईल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीमुळे विशेषतः एखाद्या स्त्रीमुळे मूड ऑफ होऊ शकतो. आठवडय़ाच्या मध्याला अतिरिक्त कामे पडतील. आपली जबाबदारी दुसऱयांवर न ढकलता पूर्ण करा, भविष्याच्या दृष्टीने हे लाभदायक ठरेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी सोडल्यास विशेष काळजीचे कारण नाही.
वाहत्या नदीत लोखंडी खिळा सोडावा
कर्क
भावनांना अति महत्त्व न देता विचार स्थिर ठेवून काम केल्यास फायदा होईल. या आठवडय़ात काही कलहपूर्ण घटना घडू शकतात. व्यर्थ वाद घातल्याने नुकसान होण्याची शक्मयता आहे. आर्थिकदृष्टय़ा काळ अनुकूल असला तरी भविष्याच्या दृष्टीने तडजोड करणे आवश्यक ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. बरेचसे गैरसमज दूर होतील.
वाहत्या पाण्यात नाणे टाकावे
सिंह
वैवाहिक जीवनात जर ताणतणाव असेल तर येणारा काळ हा अत्यंत अनुकूल असून सद्भाव निर्माण होईल. जे प्रकल्प-काम तुम्ही हातात घेतलेले आहात त्यामध्ये यश मिळेल. या आठवडय़ात काहीतरी नवीन बदल घडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱयांना शुभ संकेत आहेत. ज्ये÷ महिलेचा प्रभाव पडेल.
पांढरी मोहरी घरात टाकावी
कन्या
सध्या हाती घेतलेल्या कामांमध्ये जास्त कष्ट करण्याची गरज आहे आणि हे कष्ट बऱयाच काळपर्यंत करण्याची गरज आहे. सहजतेने सगळी कामे होतील अशी अपेक्षा करू नका. कामाच्या ठिकाणी जसे दिसते तसे नसते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. व्यक्तिगत जीवनातसुद्धा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका. विवाहोत्सुक व्यक्तींना शुभ वार्ता कळेल. प्रेमप्रसंगात मधुरता येईल.
तुळशीखालील माती जवळ ठेवावी
तूळ
आयुष्यात घडणाऱया नवीन बदलांना सामोरे जाण्याची आणि स्वप्नांना पूर्ण करण्याची योग्य वेळ आहे. या काळात भाग्य तुमची साथ देईल. एखादा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते ज्याच्यामध्ये रिस्क आहे. पण योग्य आकलन केले तर यातून फायदाच होईल. व्यावसायिक लोकांना फायद्याचे दिवस आहेत. नोकरदार वर्गाने डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नये. वैवाहिक आयुष्य समाधानकारक असेल.
धार्मिक स्थळी दूध दान द्यावे
वृश्चिक
तुमचा आतला आवाज जर तुम्ही ऐकला तर अवघड वाटणारी कामेसुद्धा सहजतेने करू शकाल. येणारप् आठवडा हा थोडा भावनिक गुंतागुंतीचा असू शकतो. हातात घेतलेल्या कामांमध्ये थोडय़ा अडचणी आल्या तरी पुढे यश नक्की आहे याची खात्री बाळगावी. वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी गडबड घाईने कोणतेही काम करू नका, चूक होण्याची शक्मयता आहे.
मुंग्यांना साखर घालावी
धनु
कामाचा पसारा वाढल्याने आणि जबाबदारी पूर्ण करण्याचे टेन्शन आल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. कामे जरी महत्त्वाची असली तरी तब्येतसुद्धा महत्वाची आहे याचे भान ठेवावे असा संदेश आहे. आजूबाजूच्या काही घटना तुमच्या मनाला त्रास देऊ शकतात. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल अशी एखादी घटना घडू शकते. व्यावसायिकांना थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे.
अशोकाची सात पाने जवळ ठेवावी
मकर
येणारा आठवडा हा कामामध्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱयांमध्ये संतुलन राखण्यासाठी उत्तम आहे त्याचबरोबर आशावादी घटना घडतील. या काळात संधी प्राप्त होतील पण मेहनत घेण्याची जास्त गरज आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये मधुर क्षण येतील. आर्थिक बाबतीत चिंता करण्याची आवश्यकता नाही. नोकरदार वर्गाला नोकरीत बदल करावासा वाटेल.
धार्मिक स्थळी दीप दान करावे
कुंभ
वायफळ चर्चा आणि नको त्या कामांमध्ये वेळ वाया घातला नाही तर बऱयापैकी चांगला आठवडा आहे. कोणतेही काम करत असताना चार चौघांना विचारून करावे. सध्याची परिस्थिती जर तुम्हाला संघर्षमय वाटत असेल तर पुढे यशाची मालिका बघायला मिळेल. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबाकडून समर्थन प्राप्त होईल. आर्थिक बाबतीमध्ये सध्या रिस्क घेऊन चालणार नाही. प्रेम संबंध सुधारतील.
मनी प्लांट घरी लावावे
मीन
तुमच्या आजूबाजूला काम करणाऱया लोकांना नीट ओळखण्याची गरज आहे. कोणावरही अतिविश्वास करणे महागात पडू शकते. या काळात तब्येतीचीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवले तर आर्थिक अडचणींचा सामना करायला लागणार नाही. कौटुंबिक वातावरण थोडे तापलेले असेल. प्रेमसंबंधात गैरसमजामुळे ताण तणाव घेऊ शकतो. नोकरीत शुभ वार्ता कळेल.
नित्य सूर्य दर्शन घ्यावे
टॅरो उपायः
सुख-समृद्धीसाठीः हा उपाय 21 दिवस नेमाने करायचा आहे. सायंकाळी करायचा आहे. उपाय कधीही सुरू करू शकता. अर्धा लिटर दुधामध्ये मधाचे 9 थेंब टाकावे. सगळय़ात वरील खोलीपासून बाहेरच्या दरवाजापर्यंत हे दूध शिंपडत यावे. उरलेले दूध लांब चार रस्ते मिळतात त्या ठिकाणी ठेवावे.





