पाचगाव वार्ताहर
आरके नगरमधील शिवाजी उद्यान येथे सुमारे वीस वर्षापासून कॉलनीअंतर्गत बससेवा सुरू होती. मात्र आरके नगर येथे राहणाऱ्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दारातून शिवाजी उद्यान बस स्टॉपकडे ही केएमटी जात असे. या केएमटी बसचा त्रास होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांने आपल्या बळाचा वापर करत शिवाजी उद्यानकडे जाणारी बस बंद करून त्याचा मार्ग बदलला आहे. यामुळे या बस थाब्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांना व मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना पायपीट करत दूरच्या बस थाब्यावर जावे लागत आहे.

आरके नगर परिसरात शिवाजी उद्यान आहे. या शिवाजी उद्यान येथे सुमारे वीस वर्षांपासून केएमटीचा बस थांबा आहे. या बस थांब्या शेजारीच मातोश्री वृद्धाश्रम तसेच बाकीची उपनगरे आहेत. या बस थांब्या शेजारीच मातोश्री वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमातील वृद्धांना या बस थांब याचा खूप उपयोग होतो.
या बस थांब्याकडे केएमटी बस येत असताना ती बस एका अधिकाऱ्याच्या दारातून जाते. या बसचा त्रास होत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने आपल्या बळाचा वापर करत चक्क केएमटीला मार्गच बदलण्यास भाग पाडले. यामुळे शिवाजी उद्यान या बस थांब्याकडे येणारी बसच बंद झाली आहे. शिवाजी उद्यानकडे येणारी बस पूर्ववत सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
हा बस थांबा बंद झाल्यामुळे मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्ध तसेच परिसरातील नागरिकांना पायपीट करत लांबच्या अंतरावरील बस थांब्यावर बस साठी जावे लागत आहे.या लांबच्या अंतरावरील बस थांब्याजवळ प्रवाशांना बसण्याची कोणतीही सोय नाही. याउलट शिवाजी उद्यान बस थांबा येथे नागरिकांना बसण्याची सोय आहे.
के एमटीबस चा मार्ग पूर्ववत सुरू करावा
केएमटी बस दारातून जात असल्यामुळे त्रास सहन न होणाऱ्या या अधिकाऱ्याबद्दल परिसरातील नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.मात्र संबंधित व्यक्ती अधिकार पदावर असल्यामुळे कोणीही उघड विरोध करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे .महानगरपालिकेचे प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने केएमटी बसचा मार्ग पूर्ववत सुरू करावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नागरिकांची पायपीट
मातोश्री वृद्धाश्रम व परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा असणारा बस मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना पायपीट करत दूरच्या बस थांब्यापर्यंत जावे लागते. तसेच बससाठी उन्हात उभा राहावे लागत आहे. पूर्वीचा बस मार्ग तात्काळ सुरू करण्यात यावा.
बाबासाहेब बुरटे देसाई









