ऑनलाईन टीम/तरुण भारत
The Kashmir Files चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वाद सुरु आहे. अनेकांनी याचित्रपटावर टीका तर काहींनी या चित्रपटाचे समर्थन केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. दरम्यान, The Kashmir Files चिटपाटला अजूनही चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वक्तव्य केल्याने सध्या आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात शाब्दिक फैरी झडत आहेत. यातच आता भर पडली आहे ती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वक्तव्याची. शरद पवारांनी The Kashmir Files चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती, तसेच भाजप चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी करत आहे असा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. त्यामुळे पवारांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अरविंद केजरीवालांनी The Kashmir Files चित्रपटावर भाष्य केल्यांनतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्याची काहीच गरज नव्हती असं वक्तव्य करून एकप्रकारे शरद पवारांनी या चित्रपटाला विरोधच केला आहे.
शरद पवार यांनी, ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रम झाला या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले पण, तिथे मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेले होते, असे शरद पवार म्हणाले.