सावंतवाडी । प्रतिनिधी
खासकीलवाडा येथील श्री देवी वटसावित्री महापुरुष मंदिराचा कलशारोहण आणि पुनर्प्राणप्रतिष्ठा सोहळा १ ते ३ मार्च २०२५ या कालावधीत खासकीलवाडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शनिवार, १ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता प्रायश्चित्त, पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, जलाधिवास, शय्यावास, नवग्रह होम, वास्तू होम. मा. सौ. अमृता अनिल कुबल यांच्या हस्ते शिखर कलश स्थापना होणार आहे. रविवार, २ मार्च रोजी मुख्य देवता स्थापना, महापूजा, नैवेद्य, आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ. रात्री ८ वाजता अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ, निरवडे यांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.सोमवार, ३ मार्च रोजी सकाळी अभिषेक पूजा आणि सायंकाळी ७ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.श्री देवी वटसावित्री महापुरुष कला क्रीडा मंडळ, युवा कार्यकर्ते आणि महिला मंडळ, खासकीलवाडा यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात सहभागी होऊन भक्तांना धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.









