23 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी : सुचीवर 14 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था / मुंबई
ईपॅक ड्युरेबल लिमिटेडचा आयपीओ शुक्रवारी शेअर बाजारात लिस्टिंगसाठी खुला झाला आहे. या वर्षातील हा तिसरा मेनबोर्ड आयपीओ राहिला आहे. या आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदार 23 जानेवारीपर्यंत बोली लावू शकतात. कंपनीचे समभाग हे बीएसई व एनएईवर 29 जानेवारी रोजी सुचीबद्ध होणार असल्याची माहिती आहे. या आयपीओमधून 640.05 कोटी रुपये कंपनी उभारणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी अर्ज करावा लागणार असून यात 65 समभाग राहणार आहेत. कंपनीने आयपीओ प्राईस ब्रँड 218 ते 230 रुपये प्रति समभाग निश्चित केली आहे. 230 च्या वरती मात्र अर्ज केल्यास एका लॉट करीता 14,950 ची गुंतवणूक करावी लागणार असल्याची माहिती आहे.









