वृत्तसंस्था/ लॉसेनी
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने पाकिस्तानला आगामी ऑलिम्पिक पात्रता फेरी हॉकी स्पर्धा भरविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तब्बल 19 वर्षानंतर पाकमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा पुढील वर्षीच्या प्रारंभी होणार आहे.
पकिस्तानमध्ये यापूर्वी म्हणजे 2004 साली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची शेवटची हॉकी स्पर्धा भरवली गेली होती. आता पुढील वर्षीच्या 13 ते 24 जानेवारी दरम्यान पाकमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये 8 संघांचा समावेश असून सदर स्पर्धा लाहोरमध्ये खेळवली जाईल. 2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रत्येक पात्र फेरी स्पर्धेतील आघाडीचे तीन संघ पात्र ठरतील. सध्या हॉकीच्या मानांकनात पाकिस्तान 16 व्या स्थानावर असून त्यांना पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्र फेरी खेळावी लागेल.









