ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले
सावंतवाडीच्या राजेशाही संस्थानचे मूळ स्थान ओटवणे गाव असून या संस्थानाच्या पुरातन ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्यासाठी राज घराण्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ओटवणे गावातील संस्थानच्या पुरातन वास्तूंच्या दुरुस्तीसह त्यांचा पर्यटन दृष्ट्या विकास केला जाईल अशी ग्वाही सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले ओटवणेवासियांना दिले.सावंतवाडी संस्थांनला गत वैभव प्राप्त झालेल्या ओटवणे शेरवाळेवाडी ब्राम्हण स्थळाच्या वार्षिक उत्सवानिमित आयोजित कार्यक्रमात युवराज लखमराजे भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर दोडामार्गचे पत्रकार संदीप देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी संजू परब यांनी गौरवशाली ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या ओटवणे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी गावात समाजभिमुख कार्य करणाऱ्या गावातील सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसह पत्रकार, पोलीस पाटील, वायरमन, तसेच गावातील कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमा दरम्यान दोडामार्ग क्लीनफ्युअल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर यांनी वृक्ष संवर्धनावर आधारीत अप्रतिम वेशभूषासहित सादर केलेले कंतारा नृत्य खास आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद मयेकर तर आभार संतोष कासकर यांनी मानले.









