निखिल सिद्धार्थ अन् अनुपम खेर मुख्य भूमिकेत
चित्रपट अभिनेता राम चरणने ‘द इंडिया हाउस’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ आणि अनुपम खेर हे महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. राम चरण हा तेलगू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो आता निर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहे.
राम चरणचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा अॅनिमेटेड प्रोमो जारी करण्यात आला आहे. यात चित्रपट आणि कलाकारांची नावे देण्यात आली आहेत. या चित्रपटाची कथा राम वामसी कृष्णा यांची असणार आहे. तसेच पहिल्यांदाच ते चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. राम चरणने स्वत:च्या चित्रपट कंपनीचे नाव व्ही मेगा पिक्चर्स ठेवले आहे.
निखिल सिद्धार्थ या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारणार असल्याचे मानले जात आहे. हा चित्रपट क्रांतिकारकांवर आधारित असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तर अनुपम खेर देखील एका क्रांतिकारकाची भूमिका साकारणार आहेत.
हा चित्रपट एका महाकाव्याप्रमाणे असू याची कक्षा अत्यंत मोठी आहे. या चित्रपटाच्या कहाणीबद्दल फारसे लोकांना माहित नसावे असे उद्गार निखिल सिद्धार्थने काढले आहेत.