भाजपमधून झाले आहेत निलंबित
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणातील आमदार टी. राजा सिंह यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाने निलंबन रद्द न केल्यास टी. राजा सिंह हे अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा पसरली आहे. परंतु राजा सिंह यांनी पक्षाने निलंबन न हटविल्यास निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले आहे. राजा सिंह हे हैदराबाच्या गोशामहल मतदारसंघातून निवडून आले आहेत. मी भाजपसाठी पूर्णपणे प्रतिबद्ध असल्याने पक्षाला नुकसान पोहोचल असे कुठलेच कृत्य करणार नसल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
भाजपला नुकसान पोहोचेल असे कृत्य मी कधीच केलेले नाही. पक्ष नेतृत्व लवकरच निलंबन रद्द करेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मी मोठा प्रशंसक आहे. तेलंगणा भाजप प्रमुख बंदी संजय कुमार आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास असल्याचे राजा सिंह यांनी म्हटले आहे.
आमदार राजा सिंह यांनी मागील वर्षी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर राजा सिंह यांना भाजपने पक्षातून निलंबित केले होते. दोन महिन्यांपर्यंत तुरुंगात रहावे लागल्यावर राजा सिह यांना 9 नोव्हेंबर रोजी जामीन मिळाला होता.









