पुणे / प्रतिनिधी :
लग्नानंतर पत्नी मुख्यत: पतीच्या घरी रहावयास जात असल्याचे आपल्याला पाहवयास मिळते, परंतु पुण्यातील खडकी परिसरात सर्वत्र विहार काॅलनीतील आर्मी काॅटरमध्ये घरजावई राहणाऱ्या जावयास सासूने घरातून दुसरीकडे रहाण्यास जाण्यास सांगितले. याचा राग जावयाला येऊन त्याने थेट सासूच्या चेहऱ्यावर गरम पाणी टाकून तिला बेदम मारहाण करुन तीचे दाेन दात पाडल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी जावयावर खडकी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र सिध्दनाथ ताेरणे (वय-२५) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे. याबाबत सुजाता कैलास शिंदे (वय-५०) यांनी आराेपी विराेधात पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार २२ मे राेजी सायंकाळी घडला आहे. तक्रारदार सुजाता शिंदे यांचा महेंद्र ताेरणे हा जावई आहे. त्यास तक्रारदार यांनी घरातून दुसरीकडे राहण्यास जा असे सांगितले हाेते. परंतु त्याचा राग मनात धरुन आराेपी जावयाने सासूचे चेहऱ्यावर गरम पाणी टाकले. त्यानंतर तिचे केसाला धरुन खाली फरशीवर तिचे डाेके आपटलून तीचे दाेन दात पाडले आहे. याबाबत पुढील तपास खडकी पाेलीस करत आहेत.