उद्यमनगर कॉन्व्हेंट शाळेत ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा
ग्रंथदिंडी, बालगीतांची मैफील, कविता वाचनासह मराठीतील बोलींचे सादरीकरण
रत्नागिरी
शहरातील उद्यमनगर येथील कॉन्व्हेंट शाळेच्या प्राथमिक विभागाने अतिशय उत्साहात मराठी राजभाषा दिन साजरा केला. ग्रंथदिडी, कविता वाचन, बालगीतांची मैफिल आणि मराठीतील विविध बोलींच्या सादरीकरणाने इंग्रजी माध्यमातील मुलांचा मराठी या विषयाबद्दलचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
या कार्यक्रमाची सुरिवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. ग्रंथदिंडीतील पालखीमध्ये मुलांनी त्यांच्या घरातून आणलेली मराठी गोष्टींची पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टींची पुस्तके लावण्यात आली असल्याने पालखीची शोभा वाढली गेली. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला हार घालून व अभिवादन करून विविध गुणदर्शन कार्यक्रमाला सुऊवात झाली. कुसुमाग्रजांच्या ‘कणा‘, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा‘, बालगीते इत्यादी कविता ऐकून विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. अलिना अलजी या विद्यार्थिनीने सादर केलेली विनोदी मालवणी कविता ऐकून विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला. यानंतर अनाया कापडे या विद्यार्थिनीने मराठी भाषेचे महत्व विशद केले. सरतेशेवटी विद्यार्थ्यांनी मालवणी, वऱ्हाडी, झाडीबोली, अहिराणी इ. मराठीच्या बोलींचे सादरीकरण पोशाखासहीत तसेच प्रत्येक बोलीतील कविता सादर करून अतिशय सुंदररित्या मांडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता चौथीमधील विद्यार्थी आरीष मालगुंडकर याने केले. या कार्यक्रमामध्ये आयशा संगमेश्वरी, सायरा मिरकर, फातीमा सोलकर, इरा डावे, इझान नेवरेकर, आहिल शहा, विहंग घाडगे, मायरा नाखवा, मेहेर मुकादम, स्वरा तांबेकर, ऊही पाटील, आयशा मुल्ला, प्रसाद तोडकर, स्वरा सकपाळ, हार्दिक भडाणे, समायरा परदेशी, एहमद भाटकर, अफिफा वागळे, निल निर्मळे, तन्वी सावंत, झिदान लांबे, शरण्या पवार, इशा भुरवणे, आराध्या तनावडे, आराध्या वरेकर, मिनसा मंगा, उझेर सारंग, श्लोक विचारे या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जेनेट व मराठी विषय शिक्षिका नम्रता शिंदे यांनी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शिरगाव केंद्रप्रमुख अमर घाडगे उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिस्टर जेनेट, शिक्षकवृंद व विद्यार्थीही उपस्थित होते.








