मंदिराच्या स्थापनेसाठी योगदान दिलेल्यांचा सत्कार
काणकोण : कराशिरमळ, आगोंद येथे उभारण्यात आलेल्या श्री मारूती मंदिराचा मूर्तिप्रतिष्ठापना सोहळा नुकताच उत्साहात झाला. या मंदिरात कारवार येथून तयार करून आणण्यात आलेल्या मूर्तीची स्थापना त्याचप्रमाणे शिखर कलश समारंभ पुरोहित आणि अन्य दांपत्यांच्या तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत झाला. 50 वर्षांपूर्वी भिडू बांदेकर, नरसिंह बांदेकर, उल्हास बांदेकर, देविदास बांदेकर, फोंडू बांदेकर, श्याम बांदेकर, कुसुमाकर देविदास, मदन बांदेकर, गौरीश बांदेकर, उमेश बांदेकर, मुकुंद बांदेकर, विश्वास बांदेकर, कमलाकर नाईक, अनिल बांदेकर, रमेश बांदेकर, रामनाथ बांदेकर, गुरुदास बांदेकर, मनोहर बांदेकर, दिनेश बांदेकर, सुभाष बांदेकर यांनी या मंदिराची उभारणी सुरू केली होती. मात्र मंदिराचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यानंतर तीन-चार वर्षांपूर्वी गुरू बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीवर सचिव सुरेखा बांदेकर, सुषमा देविदास, विशांत बांदेकर, सिद्धार्थ नाईक, तेजन मुडकूडकर, उदय देविदास, सुनील पैंगणकर, प्रशांत नाईक, संतोष बांदेकर, नागेश बांदेकर, जयेश बांदेकर, नीतेश बांदेकर, सुमित बांदेकर, अनिल बांदेकर, रमाकांत देविदास, प्रदीप गायक यांचा समावेश आहे. या समितीने अंदाजे 40 लाख रु. इतका खर्च करून या मंदिराची उभारणी केली आहे. याकामी काणकोण कोमुनिदादीचे माजी अध्यक्ष शरद ना. गावकर, पदाधिकारी धीरज ना. गावकर यांनीही मोलाचे सहकार्य केले. मंदिरातील मूर्तिप्रतिष्ठापनेच्या दिवशी काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते मंदिराच्या संस्थापकांपैकी हयात असलेल्या काही प्रतिनिधींचा त्याचप्रमाणे नूतन समितीवरील काही प्रतिनिधींचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या समारंभाच्या व्यासपीठावर खोल जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, शरद ना. गावकर, प्रशांत नाईक, गुरू बांदेकर, सुरेखा बांदेकर यांची उपस्थिती होती. श्री मारूती मंदिराच्या स्थापनेसाठी प्रयत्न केलेले पं. कमलाकर नाईक, प्रशांत नाईक, गुरू बांदेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.









